नदीच्या प्रवाहामुळे मंदिरात अडकलेल्या ५ भाविकांची अखेर सुखरुप सुटका…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर तालुक्यातील विदर्भाची पंढरी म्हणुण संबोधल्या जाणाºया माडगी येथिल वैनगंगा नदीच्या विशाल पात्राच्या मधोमध पुरातन काळापासून भगवान नृसिंह , अण्णाजी महाराज, व , स्वामी सितारामदास महाराज यांचे मुर्ती मंदिर वैनगंगा नदीच्या पात्रातील खडकावर वसलेले आहे.

येथे भगवान नृसिंह व अण्णाजी महाराजांजाचे लाखो भक्त, दरवर्षी दर्शनासाठी येत असतात, त्यातच येथिल मंदिरात यात्रा सुध्दा भरली जाते. त्याच धर्तीवर माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात खडक- ावर वसलेले भगवान नृसिंह मंदिरात आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा निमित येथिल मंदिर कमेटीच्या वतीने ३ जुलै रोजी रामायणपाठ, भजन, कीर्तन, व सुंदरकांडाचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता.त्यानंतर ६ जुलै रोजी सायंकाळी नृसिंह व अण्णाजी महाराज या़चे भक्त असलेले पाच भाविक मंदिरात पुजा करण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात पाणी कमी प्रमाणात असल्याने दुपारच्या सुमारास पायी चालत गेले.परंतु ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास वैनगंगा नदी पात्रात नदीतील पाण्यात अचानक वाढ झाली असल्याने परिमाणी पाचही भाविक नृसिंह मंदिरात अडकले. दुसºयाा दिवशी पाचही भाविकांनी आपल्या परिवारातील सदस्यांना भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली.

परंतु दिवसेंदिवस वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत गेली असल्याने पाचही भाविकांच्या नातेवा- ईकांनी तालुका व जिल्हा प्रशासनाला माहिती दिली.अखेर चार दिवसानंतर ११ जुलै रोजी याबाबत जिल्हा व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला माहीती होताच जिल्हा व तालुका प्रशासन खळबडुन जागा झाला. दरम्यान घटनास्थळी ११ जुलै रोजी दहा वाजता बचाव दलाची चमु ,तालुका व जिल्हा प्रशासनाचे अधिकारांºयाासह दाखल झाले. दरम्यान बचाव दलाच्या सहाय्याने वैनगंगा माडगी नदी पात्रातील नृसिंह मंदिरात अडकलेल्या पाचही भाविकांना सूखरुप नावेच्या साहाय्यानेबाहेर काढण्यात यश आले.

मनोहर निबार्ते (६५) रा पालोरा.ता मोहाडी. मनोहर कुरंजेकर (६१) रा. शहापुर ता.भंडारा गिरधारी वाघाडे (४१) सेंदुरवाफा ता. साकोली., कल्पना मनोहर कुंरजेकर ( ५०)रा शहापुर ता भंडारा, वैशाली चौधरी (४०) सेंदूरवाफा ता.साकोली. यात दोन महीला तर तिन पूरुष आहेत असे एकुन पाच महीला पुरुष भाविक होते. सदर घटनेचे माहिती मिळताच घटना स्थळी उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी, तुमसरचे तहसिलदार बाळासाहेब टेळे, करडीचे ठाणेदार गायकवाड, मोहाडीचे तहसिलदार वाघचौरे, कर्मचारी केशोराव गायधने, तर शोधकार्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकात सिताराम कोल्हे, अमरसिंह रंगारी,अशोक देवगडे, कुंभलकर आदींनी बचावकार्यात सहकार्य करुन पाचही भाविकांना सुखरुप बाहेर काढले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.