बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दि. १० जुलै रोजी नियमित लसीकरण व विशेष मिशन ईंद्रधनुष्य ५.० मोहिमेची जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्ह्यातील नियमित लसीकरण बाबतचे सादरीकरण जागतिक आरोग्य संघटना नागपुर विभागाचे सर्वेक्षण वैद्यकिय अधिकारी डॉ. साजिद व विशेष मिशन ईंद्रधनुष्य ५.० मोहिमेचे सादरीकरण जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी सादरीकरण केले. लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करावे व कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याचे या प्रसंगी सांगितले.

डॉ. साजिद यांनी प्रसूती झाल्यानंतर २४ तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीसबी लसीकरण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतरबाळाला हे लसीकरण देण्याचे प्रमाण योग्य आहे परंतु खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसूती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस- बी लसीकरण देण्याचे प्रमाण कमी असुन ते वाढविणे गरजेचे असल्याचे समितीला सांगितले. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय व्यावसायिकांना हिपॅटायटीस-बी लसिकरण बालकास करणेबाबत सहकार्य करण्याचे सांगण्यात आलेले होते.

परंतु त्यावर खाजगी रुग्णालय यांनी अजुनही फारसा परिणामकारक प्रतिसाद न दिल्याने अशा खाजगी रुग्णालयांवर सक्तिने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी जिल्हा आरोग्य प्रशासनास दिले. जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी, हिपॅटायटीस- बी, पोलिओ, पेंटाव्हँलंट, रोटा व्हायरस, पीसीव्ही, आयपीव्ही, गोवर- रुबेला,जेई, डिपीटी, व्हिटँमिन-अ डोज ई. विविध लसीकरण मोफत दिले जात आहे.

जिल्ह्यात नियमित लसीकरण अंतर्गत गावनिहाय लसीकरण सत्रे आयोजित करुन बालकांना लसिकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात लसिकरणापासुन वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालक व गरोदर मातांसाठी विशेष मिशन ईंद्रधनुष्य ५.० मोहिम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिला ट्प्पा ७ ते १२ आॅगस्ट , दुसरा ट्प्पा११ ते १६ सप्टेंबर, तिसरा ट्प्पा ९ ते १४ आॅक्टोंबर महिन्यात राबिविली जाणार आहे. जिल्हास्तरीय समिती सभेला जागतिक आरोग्य संघटना नागपुर विभागाचे सर्वेक्षण वैद्यकिय अधिकारी डॉ. साजिद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार ,शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. मनिष तिवारी, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय गणविर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.बी. जयस्वाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी कापसे, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे कैलास गजभिये, जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती आर.पी. मिश्रा तसेच डॉ. स्वाती घोडमारे, डॉ. विजय राऊत,डॉ. अमित कोडनकर, डॉ. ललित कुकडे, डॉ.विनोद चव्हाण, डॉ. प्रेमकुमार बघेले,डॉ. सलील पाटील ई. तालुका आरोग्य अधिकारी व सर्व ग्रामीण रुग़्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अश- ासकिय संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *