पोलिसांना चकमा देऊन कत्तलीसाठी घेऊन जाणारे जनावराचे वाहन जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : अवैधरीत्या कत्तली करता जनावरे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून या वाहनाचा पाठलाग करीत असता पोलिसांना चकमा देऊन पळून जाणारे वाहन तिरोडा पोलिसांनी बिरसी येथे पकडले. ८ सप्टेंबर रोजी रात्री तिरोडा पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांना बोदलकसा मार्गाने एका वाहनात कत्तली करता जनावरे नेत असल्याचे गुप्त बातमीदारा कडून मिळालेले माहितीनुसार त्यांनी पेट्रोलिंगवर असलेले आपले आधिनस्त कर्मचारी हवालदार देविदास तुरकर, शिपाही चोरपगार, वाहन चालक नेताम यांना या वाहना बाबत माहिती देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असता देविदास तुरकर यांचे पथकाने बोदलकसा परिसरात थांबून या वाहनाचा शोध घेतला असता ९ तारखेचे पहाटे ४:३० वाजता बोदकसाकडून भर वेगात एक पांढरे रंगाचे बोलेरो वाहन येत असल्याचे दिसल्यावरून त्यांनी हे वाहन थांबवण्याचा इशारा दिला. मात्र या वाहन चालकाने वाहन न थांबवता बेदरकारपणे भर वेगाने चालवून पोलिसांना चकमा देऊन पळ काढल्यावरून पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केल्याने हे वाहन बिरसी कडून पळून जात असताना पोलिसांनी वाहन पकडण्याचा प्रयत्न केला.

वाहन चालक व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी वाहन बिरसी येथे सोडून पळ काढल्याने पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता महिंद्रा बोलेरो क्रमांक एम. एच. ३६ ए ए १६३५ चे डाल्यात चार पांढºया रंगाचे व एक फिक्कट लाल रंगाचे गोवंश जातीचे जनावरे कुठल्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबून ठेवल्याचे दिसून आले. तसेच वाहनाचे केबिनची तपासणी केली असता यात मिळालेले ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, एटीएम कार्ड व पॅन कार्ड वरून या गाडीचा चालक राकेश रामराव सेलोकर वय २२ वर्ष राहणार गोपेवाडा पोस्ट शहापूर जिल्हा भंडारा असल्याचे समजल्यावरुन त्याचे सह गाडीत असलेला व्यक्ती, गाडीच्या मालक व माल विक्रेता यांचे विरोधात प्राण्यांचा छळ कलम ११ (१)ड, महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम सहकलम ६,९, भाद१वि सह कलम १०९, मोटर वाहन कायदा सहकलम १८४, २३९, १७७ नुसार गुन्हा नोंद करून ५ लक्ष रुपये किमतीचे वाहन व प्रत्येकी १२ हजार नुसार पाच गोवंशीय जनावरे एकूण किंमत ६० हजार असे एकूण ५ लक्ष ६० हजार रुपयाचा माल जप्त करून पुढील तपास हवालदार विजय तिरपुडे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *