महामार्गावर धुळीचे लोट, वाहनधारक त्रस्त..

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.-६ वर साकोली ते शिरपुर/बांध या महामार्गावरील पुलाचे बांधकाम अग्रवाल ग्लोबल कंपनी तर्फे मागील एक वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असून, रस्ता पूर्णत: खोदण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट निर्माण होत. असल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे महामार्गावरून येणाºया जाणाºया प्रवाशांना व परिसरात असलेल्या ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तर अनेक अपघातात झाले आहे असुन अपघात मृत्यु ही झाले आहे. सध्या वातावरणात गारठा वाढल्यामुळे आर्द्रता वाढीस लागली आहे. परिणामी या मार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी यासह मोठ्या वाहनांची असणारी वर्दळ त्यामधून निर्माण होणारी धूळ ही घातक सिद्ध होत आहे. प्रशस्त प्रमाणात या महामार्गावरील पुलाच्या निर्माण कामात मोठ्या वाहनांचा वापर होत आहे. मुरूम, खडी सातत्याने आणण्यासाठी असंख्य व ओव्हरलोड टिप्पर या ठिकाणी भरधाव प्रवास करत आहेत.

मात्र यामधून धुळीचे निर्माण होणारे लोट इतर वाहनधारकांच्या जिवावर उठले आहेत. मुळात रस्ता खोदलेल्या ठिकाणी मुरूम भरणा करण्यात आला आहे. परंतु त्यावर सातत्याने पाणी टाकणे आवश्यक असताना संबधित अग्रवाल ग्लोबल कंपनी याकडे पध्दतशीरपणे डोळेझाक करून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. वातावरणात उठणारी धूळ तासनतास खाली येत नाही, त्यात वाहनांची सातत्याने होणारी वाहतूक या मार्गावर मातीची पावडर नागरिकांवर फवारत आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते देवरी तालुक्यातील शिरपुर/बांध महामार्गावरील रत्यावरमोठ-मोठे खड्डे पडलेसुन, या मार्गावर धुळीचे लोट पसरलेल्या अवस्थेत राहत असल्याने या मार्गावरून वाहतूक करण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित अग्रवाल ग्लोबल कंपनीकडे आजवर रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी वगार्ने पाहणी का केली नसुन सूचना केल्या नसल्याचे चित्र आहे. अजून साधारण दोन वर्ष या मार्गाचे बांधकाम सुरू राहणार आहे, त्या प्रमाणात संबंधीत अधिकारी वर्गाचे या बांधकामावर लक्ष दिसत नाही. तातडीने या मार्गावर होणाºया बाधंकामाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *