पोहण्याचा मोह अंगलट, कन्हान नदीत नागपूरचे दोन तरुण बुडाले

प्रतिनिधी नागपूर/खापा : वाकी (ता. सावनेर) परिसरात फिरायला व पाटीर्साठी गेलेल्या १२ मित्रांपैकी दोघे कन्हान नदीच्या पात्रात पोहायला उतरले. पाण्यात गटांगळ्या खाणाºया मित्राला वाचविण्यासाठी गेलेलाही मित्र बुडाला. ही घटना रविवारी (दि. ३०) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. सायंकाळपर्यंत त्यांचे शोधकार्य करण्यात आले. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक ओमकलेगुरवार यांनी दिली. कुणाल गणेश लोहेकर (२४) व नितेश राजकुमार साहू (२७) दोघेही रा. स्नेहदीप, कॉलनी, जरीपटका, नागपूर अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. कुणाल व नितेश त्यांच्या इतर १० मित्रांसोबत वाकी शिवारातील कन्हान नदीच्या परिसरात फिरायला व पाटीर्साठी गेले होते. अन्य १० मित्र आपापल्या कामात व्यस्त असताना कुणाल व नितेश यांना दोघांनाही नदीत पाणी पाहताच पोहण्याचा मोह अनावर झाला आणि दोघेही पाण्यात उतरले. पोहताना कुणाल खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. नितेशने त्याला वाचविण्यासाठी त्याचा हात धरला. त्यांना पाण्यातून बाहेर निघणे शक्य न झाल्याने दोघेही बुडाले. ते बुडत असल्याचे पाहून त्यांच्या इतर मित्रांनी तिथून पळ काढला होता, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. माहिती मिळताच खापापोलिसांनी घटनास्थळ गाठून शोधकार्य सुरू केले. मात्र, अंधार होईपर्यंत दोघांचाही थांगपत्ता लागला नव्हता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *