कोराडी औष्णिक वीज केंद्राने गाठले महत्तम वीज निर्मिती सह नवे विविध उच्चांक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज निमीर्ती कंपनी मध्ये दुसºया क्रमांकाची स्थापीत क्षमता असणाºया कोराडी औष्णिक विद्युत केंद्राने झीरो डिसअलॉऊन्स चे उद्दीष्ठ गाठण्यासाठी सातत्यपूर्ण कामगीरी करीत, उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य उपयोग करीत कार्यक्षमता वाढीसह नवे विविध उच्चांक गाठले आहेत. कोराडी वीज केंद्र कार्यान्वित झाल्यापासून माहे फेब्रुवारी-२०२४ मध्ये महत्तम मासिक एमईआरसी भारांक ८६ % तसेच महत्तम मासिक सीईए भारांक ८६.५८% चा नवा उच्चांक गाठला आहे. ६६० मेगावॅटचे तीन संच कार्यान्वित झाल्यापासून माहे फेब्रुवारी-२०२४ मध्ये महत्तम मासिक एमईआरसी भारांक ८६.०१% तसेच महत्तम मासिक सीईए भारांक ८६.६५ % चा नवा उच्चांक गाठला आहे. संच क्रमांक-८, ६६० मेगावॅट कार्यान्वित झाल्यापासून, माहे फेब्रुवारी२०२४ मध्ये महत्तम मासिक सीईए भारांक ९२.२० % हा नवा उच्चांक गाठला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी.अनबलगन यांनी कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे आणि टीम कोराडीचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे. महानिर्मिती वरीष्ठ व्यवस्थापनाचे नियमित सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे तसेच कोराडी टिमच्या परिश्रमामुळे ही फलश्रुती झाल्याचे मोटघरे यांनी सांगितले.

विलास मोटघरे यांचे नेतृत्वात वीजकेंद्रातील सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार व सर्व संबंधित, नेमुन दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडीत असुन, वीज केंद्राच्या कार्यक्षमता वाढीसाठी व नव-नवे उच्चांक गाठण्यासाठी कटीबद्ध आहेत. पावसाळ्यात विजेची मागणी कमी राहत असल्याने विजेच्या संचांचे देखभाल दुरुस्ती, भांडवली खर्च कामे करण्यात येतात, जेणेकरून उन्हाळ्यात वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्याकरिता हे संच पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन करण्यास सज्ज राहावेत. आता मार्च महिना लागल्याने उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत, दुपारी विजेची मागणी २७ हजारच्या घरात पोहचली आहे आणि महानिर्मितीने उन्हाळ्यासाठी कोळशाचे पूर्वनियोजन केले असल्याने सुमारे १९ लाख मेट्रिक टन एवढा पुरेसा कोळसा साठा उपलब्ध आहे. विजेची मागणी आणि पुरवठा आकडेवारी पाहिली तर महानिर्मितीच्या एकूण २७ संचांपैकी २६ संचांतून वीज उत्पादन सुरू आहे. १ मार्च रोजी सकाळी महानिर्मितीचे औष्णिक वीज उत्पादन विक्रमी ८४६० मेगावाट इतके होते तर कोळसा, वायू, सौर आणि जलविद्युत उत्पादन एकूण ९ हजार मेगावाट इतके होते.

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी कोळशाचे सूक्ष्म नियोजन, देखभाल दुरुस्ती, भांडवली खर्च कामे, शून्य डीस अलाऊन्स धोरण, आर्थिक शिस्त, काटकसर आणि कार्यक्ष वाढीसाठी मनुष्यबळाला प्रोत्साहित केले त्यामुळे महानिर्मितीच्या वीज उत्पादनात सातत्य आणि कार्यक्षमता वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २९ फेब्रुवारी रोजी १३४० मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या खापरखेडा वीज केंद्रातून ९३.२८ टक्के भारांकासह १२५० मेगावाट उत्पादन सुरू होते तर १ मार्च रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून २९२० मेगावाट स्थापित क्षमतेच्या तुलनेत २६५० मेगावाट वीज उत्पादन ९०.५८ टक्के भारांकासह सुरू होते. पारस वीज केंद्राचा संच क्रमांक ४ मागील २०० दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून अखंडित वीज उत्पादन करीत आहे. मागील ५ वर्षांच्या तुलनेत महानिर्मितीचे फेब्रुवारी २०२४ चे एकूण वीज उत्पादन आणि औष्णिक वीज उत्पादन महत्तम तथा विक्रमी झाल्याची नोंद आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.