थोर पुरुषांंच्या विचारांचे अंगीकार करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : महापुरुषांनी स्वत:च्या दु:खांचा कधी विचारचं केला नाही महापुरुषांचे विचार, कर्तृत्व हे समाजाला प्रेरणा देणारे असून या माध्यमांतून जगाची प्रगती होत आहे ते आपल्या थोर कायार्ने अमर झाले. थोर पुरुषांचा विचारांचा अंगीकार करा .जीवनात शिस्तीला महत्व द्या. विद्यार्थ्यांनी ज्ञान प्राप्त करून स्वताचे भविष्य उज्वल करावे. नेहमी सकारात्मक विचार मनात आणून स्वत:साठि व समाजासाठी जगा जिवन आपोआपच सुखी होईल. असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे यांनी साकोली येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज स्नेह मिलन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले यावेळी मंचावर आमदार अभिजीत वंजारी शिवरामजी गिरीपुंजे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर सेवानिवृत्त तहसीलदार नरहरी चांदेवार माजी सरपंच नैना चांदेवार उपसभापती सरिता करंजेकर प्राध्यापक नरेश देशमुख एपीआय संजय पाटील उपस्थित होते

यावेळी महिलांचे हळदी कुंकू गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार वयोवृद्धांचा सत्कार तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अध्यक्ष जीभ काटे पुढे म्हणाले की संतांनी शेतकºयांच्या वेदना समाजापुढे आणल्या व त्यावर उपाय सुचविले राष्ट्रसंत खरे साहित्यिक होते यात शंकाच नाही आता बहुजनांच्या लेखणीतून शेतकºयांना न्याय मिळवून त्यांचे आयुष्यातील दु:ख निवारणासाठी साहित्यिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक गायधनी यांनी केले तर आभार प्रदर्शन रजनीताई करंजकर यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम खोब्रागडे उपाध्यक्ष संजय साठवणे सचिव हेमकृष्ण वाडीभस्मे सहसचिव रवींद्र हटवार कोषाध्यक्ष नरेंद्र वाडीभस्मे संचालक डॉक्टर रुपेश बडवाईक रामू लांजेवार शरद हटवार ताराचंद बडवाईक ज्ञानेश्वर बडवाईक रेखाताई भाजीपाले जयाताई भुरे करंजेकर ममता झिंगरे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.