बपेरा शेतशिवारात आढळल्या वाघाच्या पाऊलखुणा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : दोन दिवसापुर्वी मोहाडी तालुक्यातील मादा वाघाला जेरबंद करत नाही तोच पुन्हा तुमसर तालुक्यात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्यापुर्वी पवनी तालुक्यात वाघ दिसला. त्यामुळे एकीकडून गेला की दुसरीकडे दिसत असल्याने भंडारा जिल्हावासीयांना सतत वाघाच्या धडक्या भरत आहेत. २१ जानेवारी रोजी बपेरा येथील शेतकरी कैलास शहारे यांचे शेतात वाघाचे पगमार्क आढळल्याने परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. तुमसर तालुक्यातील चांदपूर परिसर जंगलव्याप्त असल्याने येथे वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे शिकारीच्या शोधात जंगलात असणारे वाघ, बिबटे संपूर्ण परिसर पिंजून काढत अनेकदा जंगलाबाहेर र-ि हवासी परिसरात देखील येतात. यामुळे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडतात. बपेरा हे गाव बावनथडी नदीच्या काठ- ावर असून बागायती पिकाचे क्षेत्र आहे. येथील शेतकरी कैलास शहारे हे शनिवारी त्यांच्या शेतात गेले असता वाघाच्या पाऊलखुणा आढळून आले. याची माहिती वन विभागाच्या अधिकाड्ढयांना देण्यात आली. वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली. यावेळी वाघ दिसला नसला तरी पाऊलखुणांवरून हा वाघ वयस्क असल्याचे निदर्शनास आले. तो पुन्हा आल्यास खात्री व्हावी याकरिता शेतशिवारात कॅमेरे लावण्याचे निर्देश कर्मचाºयांना देण्यात आले. तर सदर वाघ मध्यप्रदेशच्या दिशेने नदीचे पात्र ओलांडून निघून गेला असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र खात्री होईपर्यंत शेतकरी, शेतमजूरांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच वनविभागाचे कर्मचा-यावर पाळत ठेवून असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रहांगडाले यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *