विदर्भात पावसाची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे. सध्या राज्यात थंडीचा सुरू आहे. बहुतांश जिल्ह्यांत तापमान १५ अंशाच्या खाली घसरले आहे. अनेक ठिकाणी दाट धुके पडत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. म्हणजेच, राज्यातील वातावरणात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आता विभागाने मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतातही पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *