देशात ई-हायवे तयार करणार- नितीन गडकरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : देशात ई-हायवे तयार करण्याच्या योजनेवर माझे मंत्रालय काम करीत असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. संशोधकांनी यावर अभ्यास करावा, आम्ही त्यांना आवश्यक ती मदत व प्रोत्साहन देण्यास तयार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतुकीला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळायला हवे. यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अधिर भर दिला जावा, असे गडकरी म्हणाले. ई-बसनंतर ई-ट्रॅक सादर करणार आहोत. पेट्रोल आणि डिझेलचा वापर पूर्णपणे थांबविण्याची माझी इच्छा आहे, असे त्यांनी मुंबईआयआयटीमध्ये आयोजित कार्यक्रमात सांगितले. मुंबई आयआयटीच्या आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये अंतर आहे. तुम्ही संशोधनावर भर देता. सामाजिकआर्थिक स्थिती तुम्ही बदलवू शकता, त्यासाठी आवश्यक ते संशोधन तुम्ही करू शकता, असे ते म्हणाले. आयआयटीसमोर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रो व पुलामधील दोन खांबांत आपल्याकडे ३० मीटरचे अंतर आहे. मलेशियात ते १०२ मीटरचे आहे. तिथे फायबर स्टीलचा वापर केला जातो, ज्यामुळे खर्च कमी होतो. हा तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे. हवेत चालणारी डबल डेक्कर बस मुंबईत हवी. त्यामुळे वेळ वाचेल आणि वाहतूकही कमी होईल, असेगडकरी यांनी सांगितले. विद्वान असणे आणि चांगली व्यक्ती होणे यात खूप फरक आहे. ज्ञानासोबत संस्कारसुद्धा महत्त्वाचे आहेत. ब्रिटिश संसदेत बोलायची संधी मिळाली त्यावेळी मी त्यांना विचारले की, तुमच्या काय समस्या आहेत. ते म्हणाले, समाजव्यवस्था बिघडली आहे, कुटुंबपद्धतीत ह्यलिव्ह इन रिलेशनशिपह्ण प्रथा वाढल्याचे त्यांनी सांगितल्याचे गडकरी म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *