भाऊच निघाला नयन चा मारेकरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी खरबी : परसवाडा येथे रात्री घरी झोपेत असतांना १९ वर्षीय नयन महेंद्र गायधने याच्यावर अज्ञातांनी चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभिर जखमी केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर प्रकरणी पोलीसांनी आरोपींचा शोध घेतला आरोपी हा जखमी नयन याचा सख्खा भाऊ असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तुमसर तालुक्यातील परसवाडा येथे मंडईच्या पाडव्याच्या दिवशी नयन गायधने व त्याच्या मोठा भाऊ प्रणय गायधने हे दोघे भाऊ रात्री एकत्र गाढ झोपेत असताना रात्री तीन वाजेच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी घरात प्रवेश करून नयन गायधने याच्या मानेवर चाकूने वार करून त्याला जखमी केले. नयन रक्तबंबाळ झाल्यामुळे त्याच्या मोठ्या भावा ने आरडा ओरड केल्यामुळे ते दोन ते तीन हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

जखमी तरुणाला तात्काळ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीसांनी गुन्हा नोंद करीत मारेकºयाचा शोध घेतला असता पोलिसांना मिळालेल्या पुराव्याच्या आधारे जखमी नयन याचा सख्खा भाऊ प्रणय महेंद्र गायधने हाच नयन याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी कलम. ३०७,४५२, ३४. अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक रोहित मत्ताने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिरभाते करीत आहेत. अवघ्या बारा तासांमध्ये नयनच्या मारेकºयाचा शोध घेण्यात पोलीसांना यश आल्याने पोलीसांचे कौतुक केले जात आहे. घटनास्थळावरून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. प्रणयने भावाला कशासाठी मारले हे अद्यापही तपासात उघड झालेले नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *