भटक्यांच्या वस्तीवर भाऊबीज व स्नेहमिलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भटके विमुक्त कल्याणकारी संस्था भंडारा, विदर्भ प्रांततर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भटक्यांच्या वस्तीवर भाऊबीज व स्नेहमिलन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कारधा येथील मांगगारूडी समाज वस्तीवर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी तर प्रमुख अतिथी म्हणून रा.स्व. संघाचे जिल्हा सहसंघचालक अनिल मेहर, विभाग प्रचारक सुजीत कुंभारकर, भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष राजेंद्र दोनाडकर, सहसचिव श्रीकांत तिजारे, जिल्हा प्रमुख शिवाजी कांबळे, नगरकार्यवाह रामकृष्ण बिसने, सहकार्यवाह मकरंद खानापूरकर, नगर संपर्कप्रमुख भरत बलवानी उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकानी वस्तीवरील मातृशक्तीला साडीचोळी व फराळ देऊन भाऊबीज साजरी केली.प्रसंगी लोहित मतानी यांनी व्यसनाधीनता व इतर वाईट गोष्टींचा त्याग करावा, याकरिता समाजातील महिलांनी पुढाकार घ्यावा. यासाठी पोलिस विभाग आपल्या पाठीशी असून महिला सशक्तीकरनासाठी सुध्दा आम्ही प्रयत्न करू.

याशिवाय भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेनी याबाबत प्रामुख्याने लक्ष द्यावे, असे आवाहन मतानी यांनी केले. समाजातील प्रबुद्ध नागरिकांनी दिवाळीसा- रखा सणांच्या काळात स्नेहमिलन कार्यक्रम घेऊन भटक्या बांधवांच्या सोबत रहावे. बंधूभाव हाच आपला धर्म असल्याची भावना जागवून भटक्या बांधवानाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणन्यासाठी मदत करावी, असे आवाहन रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहप्रचारक परीक्षित जावळे यांनी केले. जिल्हा प्रमुख शिवाजी कांबळे यांनी संघटनेचे उद्देश सांगितले. तर राजेंद्र दोनाडकर यांनी तरुणांना व महिलांना संघटनेच्या कार्यात पुढाकार घेऊन आपला सहभाग देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन रवी नायगावकर यांनी केले. याचप्रकारे भोजापूर येथील सोनझारी वस्ती, गिरोला येथील वडार वस्ती व मोहाडी येथील गोपाळ वस्तीवर भंडारा नगरातील रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकानी भटके समाजबांधवांसोबत भाऊबीज व स्नेहमिलन कार्यक्रमातून सामाजिक समरसता साधली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *