डॉ.भैयालाल गजभिये यांना ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

भंडारा पत्रिका/भंडारा भंडारा : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या अनुषंगाने विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह नागपूर येथे संपन्न झालेल्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या नवव्या वर्धापनदिनी साहित्यिक, कवी, गायक, लेखक व सामाजिक विचारवंत डॉ. भैय्यालाल गजभिये यांच्या कार्याची दखल घेऊन यांनी लिहिलेले ग्रंथ ओबीसीओ सच्चे दुश्मन को पहचानो या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले व त्यांना सुप्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह बहाल करून ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
९ नोव्हेंबर २०१९ मध्ये बँकॉक थायलंड मध्येपहिले जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलन घेण्यात आले होते त्या साहित्य संमेलनात “बुद्धिवाद्यांचा तिरस्कार एक ऐतिहासिक संदर्भ” या ग्रंथावर त्यांना पुरस्कार देण्यात आला. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने त्यांचे जागतिक पातळीवर प्रकाशीत झालेले साहीत्य व त्यांचे उत्कृष्ट लेखन कौषल्य तसेच सामाजीक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल, साहित्यिक या श्रेणीत डॉ. भैय्यालाल गजभिये यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २८ मार्च २०२२ रोजी आडोटोरीयम सभागृह दीक्षाभूमीनागपूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान केला आहे. २६ मार्च २०२३ रोजी जागतिक आंबेडकर वादी साहित्य महामंडळाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त ओबीसीओ सच्चे दुश्मन को पहचानो या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले व त्यांना सुप्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह बहाल करून ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपरोक्त पुरस्कार वितरण समारंभाला जागतिक आंबेडकरवाद साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीचे मराठी विभाग प्रमुख डॉ. दिपक खोब्रागडे अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर अतिथी डॉ. के. पी. वासनीक दिल्ली, महेश चौगुले कर्नाटक, डॉ.जगन कराडे कोल्हापूर, मधुकर वानखेडे दिल्ली व नामवंत किर्तीचे साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार प्रविण भोंदे, श्रावण कारेमोरे तसेच आदी मान्यवर उपस्थित झाले होते. या साहित्य महामंडळाने जागतिक पातळीवर दोन साहित्य संम्मेलने थायलंड व मलेशिया या देशात घेतले आहेव जागतिक पातळीवर आंबेडकरवादी विचारांचा ठसा उमटवीला आहे. डॉ. भैयालाल गजभिये यांना सन्मानित केल्यामुळे साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीतील चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल काळबांडे यांनी तर आभार सुजित मुरमाडे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *