पोलीसांची अवैध धंद्याविरोधात धडक कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:-ं जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पोलीस विभागाने अवैध व्यवसायाविरोधात धडक मोहिम सुरू केली असुन त्याअंतर्गत पवनी पोलीसांनी अवैध जुगार अड्डा तर आंधळगाव व साकोली पोलीसांनी अवैध दारू विक्री करणाºयावर कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला. पवनी पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी पवनी येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकुन रोख रकमेसह २५ हजार ५८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्यामध्ये रोख २३ हजार ८० रुपए ,२ हजार हजार ५०० रुपए किंमतीच्या दोन मोबाईलचासमावेश आहे. यासह पोलीसांनी जुगार खेळणाºया हेमराज सहादेव जुमडे वय ३९ वर्षे, रा. मांगली , चक्रधर डोमजी जांभुळकर वय ३२ वर्षे कोंढा/ कोसरा , शिवशंकर गणपती फंदी वय ५६ वर्ष रा. कोसरा, नेपाल बालकदास खोब्रागडे वय ४१ वर्ष रा. मांगली व विक्की होमराज ठाकरे वय २७ वर्षे रा.भंडारा बोडी ता. रामटेक जि. नागपुर या पाच आरोपिंना अटक करीत त्यांच्याविरुध्द अपराध क्रमांक ३५१/२०२२ कलम १२(अ) म. जु. का. सहकलम १०९ भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

आंधळगाव पोलीसांनी दि.१४ सप्टेंबर २२ रोजी अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी दारू अड्यावर धाड टाकुन रामलाल उर्फ रामलाल दयाराम बारावी वय ५० वर्षे रा. कांद्री ता. मोहाडी यांच्या ताब्यातील दोन प्लास्टिक डबकीत प्रत्येकी अंदाजे ०३ लिटर प्रमाणे एकुण ०६ मोहा फुलाची हातभट्टी दारु किंमत ६०० रुपये , एका प्लास्टिक बॉटलमध्ये दोन लिटर मोहफुलाची हातभट्टी दारु किंमती २०० रुपये. असा एकुण ८०० रुपए किमतीची आठ लिटर दारू जप्त करीत आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला. साकोलीपोलीसांनी धाड टाकुन वासुदेव जगन रामटेके वय ५१ वर्षेे रा. सावरबंध ता. साकोली जि. भंडारा यांचे ताब्यातुन पिश वीमध्ये टायगर बॅ्रन्ड कंपनीचे संत्री देशीदारु ने भरलेले ९० एम. एल. क्षमतेचे १३ नग प्रत्येकी ३५ रुपये. असा एकुण ४५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी,अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात पवनी पोलीस स्टेशनचे १ ठाणेदार श्री. गढरी, आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक श्री. मट्टामी, साकोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. बोरकर यांनी तसेच अधिनस्त पथकातील पोलीस कर्मचाºयांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *