शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : धान उत्पादक शेतकºयांची खासगी व्यापाºयांकडून फसव णूक शासनाकडून टाळण्याकरिता एकात्मिक शासकीय धान खरेदी केंद्रातून हमीभावाने धान खरेदी केले जाते. पण चालू खरीप हंगामात नोव्हेंबर ची चाहूल लागण्याचे मार्गावर असतांनाही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यामुळे कमी किमतीत व्या पाºयांना धान विकावे लागणार असल्याने लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करून धान उत्पादकांची कुचंबणा टाळावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे. तालुक्यातील बह तांश शेती कोरडवाहू असल्याने पावसाचे पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ९० ते ११० दिवसांत निघणाºया धानाच्या वाणाची शेतकरी लागवड करतात. खरीप हंगाम २०२२ मध्ये धानाला पोषक वातावरण व आवश्यक ते पाणी उपलब्ध झाल्याने मुदतीत धान परिपक्व होऊन अनेक शेतकºयांनी धान कापणीसह मळणीही केली असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांचे म्हणणे आहे. धान उत्पादकांनी त्यांचेकडे असलेली सर्व जमा पुंजी चांगले पीक पाणी येण्यासाठी खर्ची घातलेली आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक अडचण जाणवत आहे. याचा फायदा धान व्यापारी घेतात आणि अत्यल्प दराने धान खरेदी करतात. त्यामुळे धान उत्पादकांचे नुकसान होते. यावर मात करण्यासाठी लवक रात लवकर एकात्मिक शासकीय आधारभूत धान खर दी केंद्र सुरू करावे. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *