ग्रीनफ्रेंड्स तर्फे ‘कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची’ निर्मिती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे पर्यावरणस्नेही गणेशोत्सव उपक्रम मागील १५ वर्षांपासून सातत्याने राबवित असून सोबतच कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती मागील पाच वर्षांपासून करीत आहेत. यावर्षी सुद्धा गणेशभक्तांनी आपले घरगुती गणेश मूर्ती तलावात, नदी नाल्यात न टाकता तलावाचे प्रदूषण टाळण्याकरीता कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती तसेच निर्माल्य दान व संकलन केंद्राची निर्मिती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या कार्यालयात केली आहे. लाखनी नगरपंचायतचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांच्या संकल्पनेतून मागील ५ वर्षांपासून कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्यादान संकलन केंद्राची निर्मिती करीत असतात दरवर्षी लाखनी पोलिस स्टेशनचा गणपती पोलीस इन्स्पेक्टर निखिल तायडे यांचे मार्गदर्शनात, गुरुकुल आय. टी. आय. व इतर घरगुती गणेशोत्सवमधील गणेशमूर्ती यात प्रामुख्याने रमेश गभने, प्रकाश गभने, सोपान गायधने, रामकृष्ण गिºहेपुंजे, सूनने व इतर गणेशभक्तांकडील गणेशमूर्तीचे विसर्जन दरवर्षी इथे केले जाते. सोबतच ग्रीनफ्रेंड्सच्या वतीने सर्व लाखनी -मानेगाव परिसरातील गणेश मंडळाचे निर्माल्यदान गोळा करून त्यांचे संकलन केले जाते. गणेशमूर्तीची विरघळलेली माती व निर्माल्य एकत्र करून निर्माल्यखात सुद्धा दरवर्षी तयार केले जात आहे.

यावर्षीच्या उपक्रमास गुरुकुल आय. टी. आय. चे प्राचार्य खुशालचंद मेश्राम व कर्मचारी स्टाफ यांचा विशेष सहभाग लाभला असून मानव सेवा मंडळ,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन तसेच मानवता विकास मंडळ (नेफडो जिल्हा भंडारा), अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा यांचे व सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनी यांचे सहकार्य लाभले आहे. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तसेच गुरुकुल आय.टी.आय यांचे सहकार्याने विद्यार्थ्यांकरिता पर्यावरणस्नेही (इकोफ्रेंडली) गणेश मूर्ती बनवा स्पर्धाचे आयोजन मागील १५ वर्षाप्रमाणे ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यालयात करण्यात आले. यात सिध्दार्थ कनिष्ठ महाविद्यालयातील ओंकार मंगल चाचेरे याने तसेच एम.डी. एन. μयुचर स्कूलचे अर्णव गायधने, वंश फंदे, दक्ष माकडे, करण बोकडे, संचित तरोणे, स्वामी बिसेन व अंश हटनागर यांनी पर्यावरणस्नेही मातीची व आॅइल पेंटने न रंगविता नैसर्गिक जलरंगाने रंगविलेले तसेच आकर्षक पर्यावरण देखावा केलेल्या गणेशमुर्त्या तयार केल्या त्याबद्दल यासवार्चे ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य व कार्यवाह प्रा. अशोक गायधने तसेच गुरुकुल आय.टी.आय. प्राचार्य खुशालचंद मेश्राम यांचे हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कृत्रिम विसर्जन गणेश कुंड, निर्माल्य दान व संकलन केंद्र तसेच पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती निसर्गमित्र पंकज भिवगडे, मयुर गायधने, सलाम बेग, धनंजय कापगते, नितीन निर्वाण, विवेक बावनकुळे, शिक्षक दिलीप भैसारे, हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, दिनकर कालेजवार यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *