नहराच्या पाण्याअभावी उन्हाळी धान रोवणी खोळंबली

उल्हास तिरपुडे सिल्ली : सिल्ली व परीसरातील शेतश्-ि ावारात उन्हाळी धान पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पातून येथील शेतकºयांना पुर्व सुचना न देता अचानक पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे धानाची रोपे रोवाणीसाठी तयार असतांना देखील ऐनवेळेवर पाणी बंद झाल्याने शेतकºयांची उन्हाळी धान रोवणी नहराच्या पाण्याअभावी खोळंबली आहे. तरी गार्भींय लक्षात घेता संबंधित विभागाने तात्काळ उपसा सिंचनचे पाणी सोडावे, अशी मागणी सिल्ली येथील शेतकºयांनी केली आहे. सिल्ली परिसरातील अधिकाश शेतकºयांचा मुख्य व्यवसाय शेती असून सिंचनाची सोय असल्याने येथे मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पन्न घेतले जाते. यावर्षी भंडारा तालुक्यात अवकाळी पावसाने व तुडतुडा, खोडकिडा, मावा व पेरवा अशा रोगांनी धान पिकांची पुरती वाट लावली असून ऐन पीक तयार होण्याच्या काळात पाऊस पडल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयाचे धान पिकाचे उत्पन्न घटले आणि लागवडीचा खर्चही निघाला नाही. आता पीक कर्ज कसे फेडायचे या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत परिसरातील शेतकरी उन्हाळी धान शेतीच्या लागवडीसाठी सज्ज झाले. मात्र धानाची रोपे लागवडीसाठी तयार असतांना टेकेपार उपसा सिंचन द्वारे मिळणारे पाणी अचानक बंद करण्यात आले.

नहर बंद करण्यात आले मात्र याची पुर्व सुचना शेतकºयांना देण्यात न आल्याने आता उन्हाळी रोवणी कशी करणार असा शेतकºयांना प्रश्न पडला आहे. यात काही शेतकºयांनी चिखलनी केल्यामुळे पाण्याअभावी चिखल वाळण्याची भिती शेतकºयांनी वर्तविली आहे. याबाबत टेकेपार उपसा सिंचन विभागाच्या सिल्ली परीसरात कर्तव्यावर असणाºया बागडे नामक कर्मचाºयांना फोनव्दारे विचारणा केली असता त्यांनी आम्ही सर्व शेतकºयांना याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच विद्युत विभागाचे टेकेपार उपसा सिंचन येथे काम सुरु असल्याने सदर नहर बंद करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनतर त्यांनी आम्ही याबाबत काहीच करु शकत नाही असे बोलले. आता जर या विभागाचा कर्मचारी जर असे बोलत असेल तर शेतकºयांनी रोवणीसाठी पाणी कुणाला मागायचा, असा प्रश्न आपसुकच पडत आहे. तसेच इतर शेतकºयांनी संपर्क केला असता प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाला असल्याने पाणी बंद करण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र कधी पर्यंत तांत्रिक अडचण दूर करून उन्हाळी धान रोवणी करिता पाणी सोडण्यात येईल. याबाबत कर्मचारी बोलायला तयार नाही. ऐन रोवाणीच्या काळात पाणी सोडायला तयार नसलेले कर्मचारी मात्र पाण्याची भरमसाठ आकारणी करून शेतकºयांकडून वसुली करतात, अशी शेतकºयांची संतप्त प्रतिक्रिया असून प्रशासनाने दखल घेऊन उन्हाळी धान रोवणी करीता नहराचे पाणी तात्काळ उपलब्ध करून द्यावे. अशी सिल्ली परिसरातील शेतकºयांनी मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *