विदर्भ कोंकण ग्रामीण बैंकेतर्फे भव्य कर्जमुक्ती मेळावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : एकाच दिवशी अकोला, संकटामुळे सुद्धा कर्ज फेडीत मोठा व्यत्यय आला होता. ठरवलेल्या निर्णयाला धरून एकाच दिवशी तेरा जागेवर ऋण मुक्ती मेळाव्याचे योजनेचा लाभ घेऊन १ कोटी इतक्या कर्ज रकमेतून मुक्तता मिळविली .ज्या मागणी सामान्य ऋण खाते दारांकडून होत आहे. भंडारा,चंद्रपूर आणि सोलापूर रिजन मध्ये वेगवेगळ्या १३ ठिकाणी थकीत खातेदारांसाठी विशेष कर्जमुक्ती मेळावे आयोजित करून विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. बँके कडून कर्ज प्राप्त केल्यावर , परतफेडीचे वचन दिल्याप्रमाणेच कजार्ची परतफेड होते असे नाही. काही प्रकरणांत अकल्पित अश्या बाबी घडत असतात, ज्याच्यामुळे कर्जदाराला ईच्छा असूनही, कर्जफेड करणे जमत नाही. त्यातल्या त्यात मागील तीन वर्षात कोरोनाच्या मुदतीत कर्ज फेड शक्य न झाल्याने कित्येक कुटुंबांना सिबिल मध्ये नकारात्मक रेटिंग येत होती, त्यामुळे कोणत्याही संस्थेकडून कर्ज मिळण्यास अटकाव येत होता. अश्या वेळी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेने, आपल्या अडचणीत आलेल्या थकीत खातेदारांसाठी महत्वाचा निर्णय घेत , काही विशेष सुट, सुविधा देत, कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन केले.
बँकेचे अध्यक्ष विजय वर्मा यांनी हा महत्वाचा निर्णय घेत, आपल्या कर्ज खाते धारकांच्या आयुष्यात नंदनवन फुलविण्याचे ठरविले. प्रस्तुत आयोजन केले गेले. त्यास प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३०० ऋण खात्यात, यात अंदाजे नऊ करोड रुपये प्रकरणांत तडजोड झाली आहे. दिनांक १० मार्च २३ रोजी भंडारा व तुमसर शाखेत ऋण मुक्ती शिबिर आयोजित केले होते शिबिरात बँकेचे महाप्रबंधक आदरणीय श्री अनिलकुमार श्रीवास्तव सर उपस्थित होते व मुख्यप्रबंधक प्रकाश देशपांडे सर उपस्थित होते . शिबिरात एकुण भंडारा व तुमसर शाखेतील ७८ थकीत कर्जदारांनी भेटी दिल्या, त्यातील ३२ थकीत कर्जदारांनी बँकेच्या विशेष सूट पद्धतीने बँकेच्या तुमसर व भंडारा शाखांमध्ये कॅम्प च्या माध्यमातून थकीत कर्जदारांना मोठ्या प्रमाणावर सुट देऊन त्यांना ऋण मुक्त करण्यात आले अश्या पद्धतीने बँकेच्या इतर ही शाखेत हा कॅम्प सुरू आहे, आपण जर विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे थकीत कर्जदार असाल तर ह्या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन आपली खाती एकमुस्त रक्कम भरून बंद करून घ्यावी वा नियमित करून घ्यावी.
ऋण मुक्ती मेळाव्याचे सर्व स्तरांवर स्वागत होत असून, अश्याच प्रकारे अजून मोठ्या संख्येने मेळावे आयोजित करावे अशी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे अध्यक्ष विजय कुमार वर्मा, महाप्रबंधक विमल कुमार जी, तसेच महाप्रबंधक अनिल कुमार श्रीवास्तव यांनी ऋण मुक्ती मेळावे सफल करण्यासाठी बँकेचे सर्व क्षेत्रीय प्रबंधक, शाखा प्रबंधक यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व थकीत ऋण खाते दारांना , बँके द्वारे भविष्यात आयोजित होणाºया ऋण मुक्ती मेळाव्यास भरभरून प्रतिसाद द्यावा व आपले खाते तडजोडीच्या माध्यमातून बंद करावे असे आवाहन केले आहे .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *