जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा लवकरच

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी जलसंवर्धन योजना जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट व मातीचे बंधारे बांधण्यासाठी तसेच पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी नाले पूर्ववत करण्यासाठी आणि शेततळी खोदण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले होते. वषार्ला पाच हजार गावांतील पाणीटंचाई दूर करून राज्य दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने २०१९ च्या उत्तरार्धात सत्ता हाती घेतल्यानंतर मात्र ही योजना निकृष्ट काम आणि पक्षपाताच्या आरोपात अडकली. आॅक्टोबर २०२०मध्ये नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात अनियमितता निदर्शनास आणून दिल्याचा दावा करून महाविकास आघाडी सरकारने चौकशी सुरू केली. महाराष्ट्रात केवळ ५० टक्के पाऊस पडता. जलसंधारणाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करू.

या प्रकल्पामुळे आम्ही २० हजार गावांत पाण्याची बचत केली आहे. जवळपास ३७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यामुळे शेतकºयांना एका वर्षात दोन पिके घेणे शक्य होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. यंदा अल निनोचा प्रभाव राहणार असल्याचा अंदाज काही हवामान मॉडेल्सने वर्तवला आहे. त्यामुळे यावर्षी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. पाऊस कमी झाल्यास मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची गरज भासू शकते, असे फडणवीस म्हणाले. अल् निनोच्या प्रभावामुळे भारत आणि आॅस्ट्रेलियासारह्यया काही भागांत दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते तर, जगाच्या इतर भागांत पूर येऊ शकतो.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *