हिंसाचारानंतर कोल्हापूर पूर्वपदावर, पोलिस बंदोबस्त कायम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी कोल्हापुर : कोल्हापूर शहरात टिपू सुलतानच्या फोटोचा कथित वापर आणि काही स्थानिकांकडून समाज माध्यमावर स्टेटस म्हणून आक्षेपार्ह आॅडिओ संदेशाच्या विरोधात निदर्शनादरम्यान नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर शहरात लोकांनी दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू केले आहेत. असे असले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त कायम असून, संपूर्ण शहरात विशेषत: संवेदनशील ठिकाणी मोठ्या संह्ययेने पोलिस तैनात आहेत. हिंसाचारानंतर बंद करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा हळूहळू पुन्हा सुरू केल्या जात आहेत. दोन जणांनी म्हैसूरचा शासक टिपू सुलतानचा फोटो आणि आक्षेपार्ह आॅडिओ संदेश त्यांच्या समाज माध्यमावर टाकल्यानंतर मंगळवारी शहरात तणाव निर्माण झाला.

दुसºया दिवशी या घटनेच्या विरोधात शिवाजी चौकात झालेल्या निदर्शनांदरम्यान शेकडो आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. हिंसाचार प्रकरणी किमान ३६ जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की, परिस्थिती पूर्वपदावर येत असून, शहरात दैनंदिन कामकाज सुरू आहे. इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आदेश शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत लागू होता. इंटरनेट सेवा पुरवठादारांच्या नोडल अधिकाºयांना या आदेशाद्वारे आधीच कळवण्यात आले आहे. परंतु, सर्व सेवा टॉवर पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे ते म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.