भंडारा उपविभागीय अधिकारी म्हणुन गजेंद्र बालपांडे रूजू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- तत्कालिन भंडारा येथील तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांची कारकिर्दीत अनेक सामाजिक बाबी चांगल्या आणि अवैध गोष्टीवर लगाम लावणाºया होत्या. त्यांची कामगिरी भंडारा जिल्हाभर प्रसिद्ध होती. भंडारा जिल्हा राजकारणाने व्याप्त आहे. इथे काही खर नाही राजकारणी लोकप्रतिनिधिंचे, कधी कोणत्या अधिकाºयांची शासन स्तरावरून बदली करतील याचा नेम नाही.त्यांची बदली जिहल्यात तर कधी दुसºया जिल्यात पण झाली होती. आज ते तहसीलदार पदापासून संघर्ष करून भंडारा येथे उपविभागीय अधिकारी या पदावर गजेंद्र बालपांडे रुजू झालेले आहेत.

भंडारा तालुक्यातील जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा खूप मोठया प्रमाणात आहेत. भंडारा एसडीओ साहेबांनी अवैध धंदे बंद करावेत ही मोठी अपेक्षा आहे. नवनियुक्त उपविभागीय अधिकारी भंडारा गजेंद्र बालपांडे यांनी भंडारा येथे आपल्या उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांची कारकिर्द लक्षात घेता अभिनंदन करतांना आदर्श युवा मंच भंडारा जिल्हा संयोजक पवन मस्के, भंडारा बावणे कुणबी समाज युवा समिती अध्यक्ष उमेश मोहतुरे यांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *