तलाठी व मंडळ अधिकाºयांचे काळ्या फिती लावुन आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी ठाणेदारांनी मोहाडी येथील पटवारी व मंडळ अधिकारी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे व मोहाडी पोलिस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे या मागणीला घेवुन जिल्ह्यातील सर्व १९६ तलाठी व ४५ मंडळ अधिकाºयांनी आज दिनाक २५ जुलै ते ३१ जुलै २०२३ पर्यंत पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहेत. विदर्भ पटवारी संघ नागपुर जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ जिल्हा शाखा भंडारा यांचे वतीने दिनाक १० जुलै २०२३ रोजी मोहाडी येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर चुकीच्या पध्दतीने मोहाडी पोलीसांनी नोंदविलेले गुन्हे मागे घेण्याबाबत भंडारा जिल्हाधिकारी भंडारा व जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना निवेदन देण्यात आले होते . तलाठी व मंडळ अधिकारी चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार कार्यालयीन कामकाज करतात. सदर कामकाज हे अर्धन्यायिक स्वरूपाचे आहे. सदर कामांमध्ये चूक झाली असता वरिष्ठ कार्यालयाकडे अपील करता येते.

सदर दस्तानुसार तलाठी व मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रक्रिया पार पाडली. सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक मोहाडी यांनी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता गुन्हा दाखलकेलेला आहे शासनाचे राजपत्र २०१६ मध्ये कुठल्याही शासकीय कर्मचाºयांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करायचे असल्यास कलम १५६/३ अंतर्गत त्या कार्यालयाच्या वरिष्ठ कार्यालयीन प्रमुखाची परवानगी घेणे गरजेचे आहे सदर प्रकरणात गुन्हा नोंद करतांना पोलीस निरीक्षक मोहाडी यांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्यामुळे तलाठी व मंडळा अधिकारी यांच्यामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघटना जिल्हा शाखा भंडारा यांच्या वतीने आजपासून काळ्याफिती आज २५ जुलैपासुन काळ्या फिती लावुन आंदोलनाला सुरूवात करण्यात आली असुन ३१ जुलै पर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे . त्यानंतर १ आॅगस्ट रोजी महसूल दिनावर बहिष्कार टाकून ४ आॅगस्टला सर्व तलाठी मंडळ अधिकारी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. तसेच दिनांक ९ आॅगस्ट क्रांती दिनी सर्व तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या चाव्या कार्यालय प्रमुखांकडे जमा करून सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. या काळात केवळ निवडणूक व नैसर्गिक आपत्तीचे कामे सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हे करतील .असे विदर्भ पटवारी संघ नागपुर जिल्हा शाखा भंडारा व विदर्भ मंडळ अधिकारी संघ जिल्हा शाखा भंडारा तर्पेष्ठ कळविण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *