पोलीस विभागाचा नवा उपक्रम बिट मार्शल शुभारंभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी श्रीमती रिना जनबंधु, पोलीस उपअधिक्षक (गृह) विजय डोळस यांचे उपस्थितीत भंडारा शहरात बिट मार्षल उपक्रम शुभारंभ पोलीस स्टेशन भंडारा येथे करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी भंडारा जिल्हयात मोठया प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे त्यामध्ये बंद जागेतील जुगार, सट्टा पटी, अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चाललेली तरुण पिढी अस्ताव्यस्त रहदारी व ग्रामीण भागात पोलीसाबद्दल असलेली नकारात्मक भावना यासारखे आव्हानेही मिळाली. अधिनिस्त अधिकारी/ कर्मचारी यांचेशी योग्य समन्वय साधुन व सगळयांना पोलीस कर्तव्याची नव्याने जानीव करुन देत जिल्हयातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याकरीता नव्या दमाने कामास सुरुवात केली. अवैध ध्ांद्दयांविरुध्द कडक मोहीम राबवुन भंडारा पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील सट्टा पट्टी व जुगाराचे, अमली पदार्थ असे अवैध धंद्दे संपुष्ठात आनले. तसेच नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन जिल्हयातील सर्वसामान्य जनते करीता दोन मोटार सायकल बिट मार्षल क्र. १ व बिट मार्षल क्र. २ मोटार सायकल दोन मार्षल पथकांचे उपक्रम राबविण्यात आले. पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी यांच्या हस्ते सदर मोटार सायकल बिट मार्षल पथकांचे उद्घाटन करण्यात आले.

बिट मार्षल याच्या कडून क्रमांक १ : पेट्रोलींग परीसर, खुली मैदाने व एकांतातील ठिकाणे, गर्दीचे ठिकाणे, शाळा/महाविद्यालये. बिट मार्षल याच्या कडून क्रमांक २ : पेट्रोलींग परीसर, खुली मैदाने व एकांतातील ठिकाणे, गर्दीचे ठिकाणे, शाळा / महाविद्यालये. व्हीजीट बुक ठेवलेले ठिकाण १. वैष्णवी पेट्रोलपंप- प्रगती कॉलनी, २. भृषृंड गणेष मंदीर मेंढा, ३. बाळकृष्ण मेडीकल स्टोर्स बडा बाजार, ४. जिल्हा रुग्नालय भंडारा, ५. बस स्थानक, ६. बालाजी पेट्रोलपंप पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ. व्हीजीट बुक ठेवलेले ठिकाण १. दुग्ध फेंडरेशन टाकळी, २. गोपीका किराणा स्टोर्स विघ्नहर्ता चौक, ३. ताज पेट्रोलपंप खोकरला, ४. आमदार भोंडेकर यांचे कार्यालय मुस्लीम लायब्ररी चौक भंडारा, ५. न्युलाईफ हॉस्पीटल राजीव गांधी चौक भंडारा, ६. अर्बन को आॅप बॅक गणेशपुर, ७. गाढवे पेट्रालपंप बेला. बिट मार्षल या दोन्ही पथकांनी करावयाची कार्यवाही खालीलप्रमाणे १. कलम १०९ जा. फौ., २. कलम ६५(ई), ८४, ८५ (१) म. दा. का., ३. कलम २७, २९ एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट, ४. कलम (अ) म. जु. का., ५. कलम ११०, ११२, ११७ म. पो.का. यावेळी कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक भंडारा ठाणेदार सुभाष बारसे, राखीव पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी पोलीस विभागाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हजर होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *