श्रीराम शोभायात्रा समितीने उभारली भव्य गुढी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : श्रीराम शोभायात्रा समिती भंडाराच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात आज भंडारा शहरातील गांधी चौकात विशाल अशी गुढी उभारून करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील प्रमुख चौकात असर फाउंडेशनच्या कलाकारांनी मराठीसंस्कृतीचे महत्त्व सांगणारे नृत्याविष्कार सादर केले. श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने मागील पन्नास वषार्पासून शहरात शोभायात्रेचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे ५१ वर्षे आहे. समितीच्या वतीने केवळ शोभायात्रा न काढता राम नवरात्राच्या नऊ दिवस विविध कार्यक्रम घेतले जातात. गुढीपाडवा ते श्रीराम नवमी या कालावधीत या कार्यक्रमांचे आयोजन होते. आज याची सुरुवात शहरातील गांधी चौकात विशाल अशी गुढी उभारून झाली. आज सकाळी ७ वाजता चौकात एकत्र येत नागरिकांनी श्रीरामाचा जयघोष केला.
यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, विभाग संघचालक राम चाचेरे, श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष हेमंत आंबेकर, शुभांगी मेंढे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. नंतर असर फाउंडेशनच्या कलाकारांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाºया कलाकृतीचे सादरीकरण केले. गांधी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर शहरातील प्रमुख चौकांमध्ये गुढी उभारून असर फाउंडेशनच्या कलाकारांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे या हेतूने समितीने असर फाउंडेशनच्या माध्यमातून हा प्रयत्न केला. काल गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातून महिलांची मोटार सायकल रॅली काढण्यात आली. खांबतलाव परिसरातील राम मंदिर जवळून निघालेल्या रॅलीचा समारोप तुळजाभवानी मंदिर परिसरात झाला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *