एकाच रात्री पाच घरफोड्या, २ लाखांचा ऐवज लंपास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शहरात विनोबानगर व गोवर्धन नगर परिसरात पाच घरफोड्या झाल्याची घटना रविवारी घडली. त्यात सुमारे दोन लाखांचे ऐवज लंपास करण्यात आले. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांपुर्वी याच परिसरात घरफोडी झाली होती. तुमसर शहरात काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरू आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोवर्धन नगरातील जांभूळपाने यांच्या घरी चोरी झाली. पंधरा दिवसांपुर्वीही त्यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. त्यात कोणतेही साहित्य चोरीला गेले नाही. विनोबानगर येथे गजानन वरकडे यांच्या घरी रविवारी चोरी झाली. त्यात मंगळसूत्र, कानातले दोन सोन्याचे जोड असा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी साईनगर येथील सेलोकर, राणे व पराते यांच्या घरी घरफोडी केली. परंतु तिथे त्यांना रोख व ऐवज मिळाला नाही. तुमसर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. चोरट्यांची टोळी मध्ये प्रदेशातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.