तिरोडी डेमू ट्रेनचा बालाघाट पर्यंत विस्तार

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : तुमसरला बालाघाटशी रेल्वे विकासाअंतर्गत जोडण्याची १९७६ पासून केलेली मागणी आज खरी ठरली, तुमसर रोड जंक्शन तिरोडी डेमू ट्रेनचा बालाघाट, बालाघाटपर्यंत विस्तार करून शिवनीचे खासदार यांनी नवीन वर्षाची भेट दिली, हे सिद्ध होईल. या प्रदेशाच्या रेल्वे विकासातील महत्त्वाचा टप्पा, भारतीय प्रवासी केंद्र, तुमसर, दैनिक प्रवासी मंडळ, तुमसर, लायन्स क्लब, झुलेलेलाल सेवा समिती, इत्यादी पदाधिकाºयांनी खासदार डॉ. ढालसिंग बिसेन यांचे आभार मानले. तुमसर रोडने तुमसर टाऊन सिटी पॅसेंजर हॉल्ट येथे येताच गुलाबाच्या पाकळ्या देऊन स्वागत करण्यात आले. नंतर लोको पायलट प्रमोदकुमार राव, सह लोको पायलट हेमराज डहारे, गार्ड विजय कुळमेथे यांचा पुष्पहार अर्पण करून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या हस्ते रेल्वे इंजिनचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी झुलेलाल सेवा समितीचे अध्यक्ष हुंदलदास रोचवानी यांनी तुमसर शहर ते बालाघाट या ट्रेनमधील प्रवाशांना बिस्किटांचे वाटप करून या ट्रेनच्या विस्तारीकरणाबद्दल आनंद व्यक्त केला. बालाघाट ट्रेनला भारतीय प्रवासी केंद्र तुमसरचे सचिव सीताराम जोशी वल्लभ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येवून रेल्वेगाडी रवाना करण्यात आली.
यावेळी प्रवासी केंद्र तुमसरचे कार्याध्यक्ष बेनिशाम खंडेलवाल, मनोज उकरे, टाटा लांजेवार, किशोर चौधरी, के. के. पंचबुद्धे, अशोक कुकडे, अ‍ॅड. आशिष कुकडे, सुधाकर कारेमोरे, गुलराज कुंदवानी, जेसाराम रंगवाणी, चंद्रशेखर भोयर, दिनेश अग्रवाल, खुशाल नागपुरे, किशोर नागपोता, अ‍ॅड. विवेक स्वामी, अ‍ॅड., कृष्णा मोटवानी, अ‍ॅड. नवीन उपाध्याय, सोनू शर्मा, विठ्ठल पचोली, मंगेश डुंभरे, मनमोहन पांडे, विष्णू जोशी, शाम भैरम, ज्ञानेश्वर बिरनवरे, राजकुमार मर्ठे, खेमू गभणे, दिलीप गुप्ता, विष्णू गाढवे यांचा समावेश होता.तसेच रेल्वेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक, आबाल वृद्ध उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *