साकोली तालुका काँग्रेसच्या वतीने भव्य मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून शेतकºयांच्या धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते. सदर मोर्चा साकोली येथील संत लहरी बाबा मठातून काढण्यात आला व राष्ट्रीय महामार्गाने सरकारविरोधी घोषणा देत वीज वितरण कार्यालयावर धडकला. साकोली तालुक्यातील शेतात उन्हाळी धान पिकासोबतच भाजीपाला पिके घेतलेली आहेत. शेतकºयांकडे पाणी देण्यासाठी साधन उपलब्ध आहेत परंतु राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वीज वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतातील पिके जगवायची कशी असा प्रश्न आता शेतकºयांपुढे उभा राहिलेला आहे. त्यामुळे कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा आणि मागील वर्षभरापासून डिमांड भरून सुद्धा शेतकºयांना वीज जोडणे होत नसल्याने व इतर शेतकºयांच्या विविध मागण्यांचे निवेदन मोर्चाचे माध्यमातून संबंधित अधिकाºयांना देण्यात आले.

यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, साकोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक कापगते,समाज कल्याण सभापती .मदन रामटेके, महिला काँग्रेसचे अध्यक्ष .छायाताई पटले, जि.प.सदस्य नारायण वरठे, जि.प. सदस्य शितलताई राऊत, साकोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप मासुरकर,साकोली शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अश्विन नशिने, शेतकरी नेते अजय तुमसरे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा परिषद च्या माजी समाज कल्याण सभापती सौ.रेखाताई वासनिक,प.स.सभापती गणेश आदे, उपसभापती सरिता करंजेकर, पं.स सदस्या,दीपक मेंढे माजी जिल्हा परिषद सदस्य, अर्चनाताई इळपाते, पं.स. सदस्या करुनाताई वालोदे, डॉ.ललित हेमने तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *