गळफास लावुन शेतकºयाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे सततच्या नापिकीला कंटाळून वृद्धाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.१८) ला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. संताराम नारायण ढवळे वय ७५ वर्ष रा. केसलवाडा (वाघ) असे मृतक वृद्धाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक संताराम हे वयोवृद्ध असून त्यांची गराडा शेतशिवारात ०.२९ हे.आर जागा आहे. मागील काही दिवसांपासूनसतत पडणाºया पावसाने हातात आलेले पीक कापता येत नाही आणि घरीही नेता येत नाही त्या विवंचनेने निराश होऊन मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान स्वत:च्या राहत्या घरातील आड्याला नायलॉन रस्सीणे गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना व महसूल विभागाला देण्यात आली. महसूल विभागाचे तलाठी मंजु तखरे यांनी दिलेल्या अहवालानुसार सदर शेतकºयाची गराडा येथे गट क्र. ४४१/२ क्षेत्र ०.२९ हे.आर जमीन असून त्यांच्या मागे पत्नी सत्यवती संताराम ढवळे, नेपाल संताराम ढवळे मुलगा, नामदेव संताराम ढवळे मुलगा हे कुटुंबातील व्यक्ति असून नामदेव हा एका खाजगी संस्थेत शिक्षक असल्याची माहिती आहे. संतारामच्या आत्महत्येचे कारण कळू नसले तरीही झोपलेला धान असल्याची गावकºयात चर्चा आहे. घटना स्थळी पोलिस हवालदार आकांत रायपूरकर पोलिस शिपाई पियुष बाच्छील, स्वप्नील कहालकर घटनास्थळी पोहचले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.शवविच्छेदणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नामदेव संताराम ढवळे यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस हवालदार वासंती बोरकर व पोलिस शिपाई हरिश्चंद्र देवकते करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *