खा. सुनिल मेंढे यांच्या प्रयत्नांने विविध रस्त्याच्या कामास मंजुरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अपघातांच्या घटनामुळे भंडारेकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा ठरलेल्या भंडाराखात-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील दुरसंचार विभाग कार्यालय ते खात रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या मार्ग मोकळा झाला असून १२ आॅक्टोबर २०२२ रोजी याला मान्यता देण्यात आली आहे. सध्यास्थितीत जेवढ्या रुंदीचा हा मार्ग आहे. तेवढ्याच रुंदीच्या मागार्चे सिमेंटीकरण होणार असून यामुळे अपघाताच्या घटनावर अंकुश लागणार आहे. खा.सुनिल मेंढे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नातुन हे शक्य झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने काही रस्त्यांच्या विषयांना घेऊन खा.सुनिल मेंढे मागील काही वषार्पासून सात्यात्याने पाठपुरावा करत आहेत. १७ जाने २०२० रोजी स्थानिक पातळीवर संबंधित विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा केली गेली. १४ जुलै २०२२ रोजी पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालय मुंबई येथे खा.सुनिल मेंढे यांच्या मागणीनुसार बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर-रायपुर राष्ट्रीय महामार्गावरील शिल्लक असलेल्या फुलमोगरा ते वैनगंगा नदीच्या पुलापर्यंतच्या चौपदरीकरणाचा विषय चर्चिला गेला. कारधा- पवनी-निलज फाटा महामार्गाच्या अनुषंगाने विषय घेण्यात आला. या मार्गाच्या कामात येणाºया वनविभागाच्या अडचणीवर चर्चा होऊन बैठकीत तोडगा काढण्यात आला. सोबतच भंडारा शहरातुन जात असलेल्या भंडारा – रामटेक मार्गावरील भंडारा दूरसंचार विभाग कार्यालय ते खात रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यन्तचा रस्ता निर्मितीचा दृष्टीने चर्चा झाली.

हा मार्ग अपघाताच्या दृष्टीने घातक ठरीत असल्याने नागरिकाकडून सातत्याने ओरड होत होती. भंडारेकरांची ही अडचण लक्षात घेता हा विषय अधिक गांभीर्याने घेण्याच्या सुचना खासदारांनी केल्या होत्या. दरम्यान या मागण्याच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय झाल्याचे समजते. दरम्यान भंडारा शहरातून जाणाºया व धोकादायक ठरलेल्या दूरसंचार कार्यालय ते रेल्वे क्रॉसिंग या मार्गाचे सिमेंटीकरणच्या कामाला १२ आॅक्टो २०२२ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे आता हा मार्ग सिमेंटचा होणार असून खड्यामुळे होणाºया अपघातापासून भंडारेकरांची मुक्तता होणार आहे. उपलब्ध असलेल्या रुंदितच या भागातून रस्त्याचे सिमेंटीकरण होणार असल्याने लवकरच काम सुरु होऊन दिवाळी नंतर हा रस्ता भंडारेकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. सध्या या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी ९.२५ लक्ष रुपयाचा कार्यारंंभ आदेश देण्यात आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या विषयांना होऊन खासदार सुनिल मेंढे सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर याला यश येत शहरातील अडचणीचा ठरणारा मार्ग सुकर होणार आहे. यामुळे अपघाताच्या घटनावर अंकुश लागणार आहे. रस्त्याच्या निर्मितीला मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल खासदार सुनिल मेंढे यांचे आभार मानले जात आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *