राष्ट्रवादी ने काढली ‘गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा’

भंडारा : भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज दि.१३ मार्च रोजी जि केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ व महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान ‘ गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा’ काढण्यात आली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भंडारा जिल्हाधिकारी यांचेमार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात, गॅसची केलेली दरवाढ कमी करण्यात यावी, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगारांना नौकरी व काम उपलब्ध करून करण्यात यावीं, पुराचे पाण्यामुळे बाधीत झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील रहिवाशांना प्रति कुटूंब २५ हजाराची नुकसान भरपाई देण्यात यावी, धान उत्पादक शेतक-यांच्या धानाला ३ हजार रुपए प्रति क्विंटल हमी भाव देण्यात यावा. , ग्रामीण व शहरी भागातील घरकुलसाठी अनुदानात वाढ करण्यात यावी, घरकुलासाठी १० ब्रास रेती नि:शुल्क देण्यात यावी व धान उत्पादक शेतक-यांना १ हजार रुपए. प्रति क्विंटल बोनस देण्यात यावा आदि मागण्यांचा समावेश आहे. यावेळी केंद्रशासन व महाराष्ट्र शासन आणि पन्नास खोके घेतलेल्या आमदारांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, सुनंदा मुंडले, रिता हलमारे, जिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, नेहा शेंडे, हेमंत महाकाळकर, अ‍ॅड. विनयमोहन पशिने, शेखर (बाळाभाऊ) गभने, प्रा. नारायणसिंग राजपुत, रत्नमाला, चेटूले ,धनेंद्र तुरकर, मंजुषा बुरडे, नंदा झंझाड, नरेंद्र झंझाड, आरजु मेश्राम, विजय सावरबांधे, अविनाश ब्राम्हणकर, संजय बोंदरे, नागेश भगत, ठाकचंद मुंगुसमारे, सचिन उके, अरुण अंबादे, उमेश ठाकरे, हर्षिला कराडे, संध्या बोदले, संजोक्ता सोनकुसरे, किर्ती गणविर, रिना साखरकर, आशिष दलाल, शिशुपाल गौपाले, विक्रम उजवणे, नरेश इलमकर, सुनिल साखरकर, सोनु खोब्रागडे, अहुजा डोंगरे, जितेंद्र बोंद्रे, अशोक हजारे, अर्चना देंगे, नुतन मेंढे, बेबीबाई आसोले, सुनिता निर्वाण, वंदना खोब्रागडे, डॉ. रविंद्र वानखेडे, चेतन माकडे, इमरान शेख आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *