प्रवासी सेवा समितीच्या सदस्यांनी केली तुमसर रेल्वे स्थानकाची पाहणी

भंडारा पत्रिका प्रतिनिधी भंडारा : नागपूर विभागांतर्गत तुमसररोड स्थानकांची तपासणी रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रत्न यांच्या मार्गदर्शनात समितीचे सदस्य, किशोर शामबाग आणि जे.एल.नागवाणी यांनी केली. तुमसररोड स्थानकावर २० सप्टेंबर २०२२ रोजी नागवाणी यांनी पुरुष-महिला प्रतीक्षालय, खानपान व्यवस्था, प्लॅटफॉर्म, पाण्याची व्यवस्था आणि स्थानक परिसरातील स्वच्छता, वॉटर बूथ, स्थानकावर उपलब्ध स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी वॉटर बूथ आणि स्वच्छतागृहाची तपासणी केली. स्टेशन मॅनेजर, रूम इ. सार्वजनिक खाद्यपदार्थ, केटरिंग, वेंडिंग स्टॉल्स, पुस्तकांचे स्टॉल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था, दिव्यांगांना पुरवल्या जाणाºया सुविधा, स्वच्छता, अन्न व पाण्याच्या बाटलीची वैधता तारीख, परवान्याची वैधता तारीख आदींचीही तपासणी केली.

प्रवासी प्रतीक्षालयातील स्वच्छता, आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे, पाण्याचे नळ आदींची पाहणी केली. स्थानिक शाळेतील मुलांसोबत प्रांगणात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती करण्यात आली. या संपूर्ण दौºयात स्थानकावरील सुरक्षेच्या सर्व व्यवस्थेबरोबरच स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रवाशांशी चर्चा करून, त्यांच्याकडून अभिप्राय घेऊन तसेच जनतेने दिलेल्या निवेदनाचा विचार करून प्रवाशांची सोय करण्याचे आश्वासन दिले. विभागातील या स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधा दिल्या जात असल्याबद्दल समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. याप्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए.के. सूर्यवंशी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रविशकुमार सिंग यांच्यासह संबंधित विभागीय अधिकारी व विभागाचे पर्यवेक्षक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *