शास्त्रीय नृत्यकलेचा प्रचार-प्रसार व्हावा : शुभांगी मेंढे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक लोकांमध्ये शास्त्रीय नृत्याची आवड निर्माण करण्याचा पहिला मान नूपुर नृत्य निकेतनला जातो. सूचना बंगाले यांनी युवा पिढीमध्ये भरतनाट्यम, कथक सारख्या आपल्या प्राचीन नृत्य प्रकारांची गोडी निर्माण केली आहे. हे शास्त्रीय नृत्यकलेच्या प्रचार-प्रसाराचे कार्य असेच पुढे सुरू ठेवावे, असे शुभांगी मेंढे यांनी व्यक्त केले. नूपुर नृत्य निकेतनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित रविवारी ‘मधुसूदनाय’ या संगीत व नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष जॅकी रावलानी, विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांतचे उपाध्यक्ष संजय इकापुरे, भंडाºयाचे खासदार सुनील मेंढे यांच्या पत्नी व नूपुर नृत्य निकेतनच्या अध्यक्ष शुभांगी मेंढे व माजी शिक्षणाधिकारी संजय आयलवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी धर्मापुरी आश्रमातील बालकदास महाराज, कथक गुरू अक्षय शहाणे व नुपूर नृत्य निकेतनच्या संचालिका सुचना बंगाले यांची उपस्थिती होती. आपली भारतीय संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे असून तिला जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य सूचना बंगाले करत असल्याचे मत संजय आयलवार यांनी व्यक्त केले. नूपुरच्या विद्यार्थ्यांनी यावेळी पुष्पांजली, मुरलीधर कवित्वम, गणेश कीर्तनम, शिवस्तुती, देवी कीर्तनम्, रामाष्टकम, कोरथी (लोकनृत्य), गुरुस्तुती (कथक), अक्षय यांचे कथक रंग सादर केले. कार्यक्रमाचा समारोप ‘मधुसूदनाय’ या नृत्यनाटिकेने झाला. सूचना बंगाले यांनी नटूवाङमवर, कर्नाटक गायन सुंदरी पद्मनाभन, मृदंगमवर विशाल नायडू, वॉयोलिनवर शिरीष भालेराव, बासरीवर शिवलाल यादव यांची साथ दिली. या नृत्यनाटिकेचे लेखन अ‍ॅड. गौरव खोंड यांनी तर दिग्दर्शन सतीश बागडे यांनी केले होते. निवेदन शीतल कोल्हेकर यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *