प्रसूतीनंतर पुन्हा एका महिलेचा मृत्यू!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : काही दिवसांपूर्वी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा भंडारा जिल्हा रुग्णालयात एका प्रसूतीनंतर महिलेचा २४ तासांतच मृत्यू झाला. आशा वासनिक असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी उघडकीला आली. माहितीनुसार, दि. ३० जुलै रोजी भंडारा तालुक्यातील गोपेवाडा येथील आशा वासनिक यांना दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती वेदना वाढल्या होत्या. याच दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला. यावेळी दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येते; मात्र ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास महिलेची प्रकृती अचानक बिघडू लागली. श्वास घेण्याचा त्रास तिला होत होता. यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

महिलेच्या शरीरातील रक्तातील साखरकमी झाली होती व इतर समस्याही वाढू लागल्या होत्या. कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांनी तिची तपासणी केली. मात्र महिलेची प्रकृती अधिकच ढासळत गेल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. एकीकडे बाळाच्या जन्माची कुटुंबात आनंदाची लाट असताना दुसºया दिवशी महिलेचा मृत्यू झाला. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आॅपरेशन झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे. वैद्यकीय हलगर्जीपणा आहे की अन्य कारण याचा शोध लागणे अत्यंत गरजेचे आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.