अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याबाबत राष्टÑवादीचे मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दिनांक १४ आॅक्टोबर २०२२ रोजी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र शासन यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत धानाला १०००/- रू. बोनस देऊन जिल्हयात सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याबाबत व धान उत्पादक शेतकºयांच्या व जनसामान्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत निवेदन देण्यात आले. प्रमुख मागण्यांमध्ये जिल्हयात सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिंकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. धान उत्पादक शेतकºयांना प्रति क्विंटल १००० रुपए बोनस देण्यात यावे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकºयांना आॅनलाईन सातबारा करण्याकरीता स्वत: केंद्रावर जावे लागते. वयोवृध्द शेतकरी त्यामध्ये महिला, आजारी शेतकरी यांना सातबारा आॅनलाईन करण्याकरीता तासनतास केंद्रावर उभे रहावे लागते. तरी सदर शेतकºयांची स्वत: जाण्याची अट शिथिल करण्यात यावी.

महाराष्ट्रातील वेदांता ग्रुपचा उद्योग गुजरातच्या घशात घातला तो परत महाराष्ट्रात स्थापित करण्यात यावा. जनावरांवरील लम्पी आजारावर ग्रामीण व शहरी भागात शिबीर लावून तातडीने लसीकरण करण्यात यावे. जिल्हयात हिंसक वन्य प्राण्यांमुळे झालेल्या जिवित हानी व पिक नुकसानीचा मोबदला अजून पर्यंत देण्यात आलेला नाही तरी त्यांना तातडीने मोबदला देण्यात यावा. जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची हानी घरांच्या व गोठयाच्या नुकसानीचा मोबदला तातडीने देण्यात यावा. महाविकास आघाडी सरकार ने खरीप हंगामामध्ये उत्पादीत होणाºया व किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरेदी होणाºया धानाकरीता प्रोत्साहन राशी जाहिर केली होती ती देण्यात यावी. शेतकºयांचा धान शासकीय आधारभुत हमीभाव खरेदी केन्द्रावर प्रति एकरी २० क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवून २५ क्विंटल प्रति एकरी करण्यात यावी. अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील रस्ते व नाले खराब झाले आहेत. ते दुरुस्त करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *