शेतकरी संकटात असतांना शिंदे सरकार अयोध्या दौ-यावर!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकरी संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीत राज्यातील शिंदे सरकारने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना तात्काळ मदत कशी देता येईल याचा विचार करणे गरजेचे सर्वसामान्यांचे जगणे कठीण होवुन बसले आहे.आज देशात दररोज १३ कोटी जनता एक वेळ उपाशी झोपते ही यापेक्षा दुसरे दुदैव कोणते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना २०२२ च्या बजेटमध्ये शेतकरी प्रोत्साहन योजनेकरीता निधीची तरतुद करण्यात आली होती मात्र एक आहे.मात्र राज्यातील शिंदे सरकार हे आयोध्येच्या वारीवर असुन राज्यातील शेतकरी वाºयावर अशी परिस्थिती आहे.बळीराजाला मारून अयोध्यावारी करणाºयांना भगवान राम कधीच पावणार नाही अशी टिका माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात ईडी च्या धाकामुळे ईडी चे सरकार आले .
सरकारने मागील दहाअकरा महिन्यात ज्या घोषणा केल्या त्या प्रत्यक्षात दिसुनच येत नाही एकंदरीत राज्यातील ईडी सरकारने जनतेची फसवणुक केली आहे.आज महागाईने उच्चांक गाठला आहे. वर्षे लोटुनही शेतकºयांना या योजनेचा लाभ अद्यापही मिळाला नाही. राज्यातील ईडी सरकारने १४ मार्च २०२३ रोजी एक अध्यादेश काढुन एमपीएससी प्रवगार्तील पदे वगळता सर्व पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्याचा निर्णय जाहिर केला आहे.हा निर्णय म्हणजे राज्यातील एस.सी., एस.टी. व ओबीसी समाजाचे आरक्षण मोडीत काढण्याचा प्रकार आहे. राज्यातील एस.सी., एस.टी. व आदीवासी समाजाचा निधीमध्ये मोठया प्रमाणात कपात करण्यात आली असुन त्याचे परिणाम या समाजाच्या विकासाच्या योजनांवरपडणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील बहुजनांमध्ये मोठा असंतोष दिसुन येत असुन त्याचा फटका येत्या काळात ईडी सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही असेही वडेटटीवार यावेळी म्हणाले. अगोदर एकमेकांशी राम-राम घेत माणसे जोडली जायची आता मात्र रामराम म्हणत माणसे तोडण्याचे काम चालविले आहे.जाती व धर्माच्या नावावर मते मिळविण्याचे काम सुरू आहे.नुसते मतांसाठी रामाला पुजले जात आहे असेही श्री.वडेट्टीवार यावेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या दयेवर शिंदे सरकार जिवंत आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
आणि त्यामुळेच शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ज्या पध्दतीने पाडण्यात आले त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात उध्दव ठाकरे यांच्याविषयी मोठी सहानुभूती असुन उध्दव ठाकरे यांच्या सभेला होणारी अलोट गर्दी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.राज्यातील जनता ईडी सरकारच्या विरोधात असल्याचे भाजपच्या निवडणुक सव्हेर्तुन पुढे आले आणि म्हणुनच राज्यातील सर्वच निवडणुका ईडी सरकार लांगणीवर टाकत आहे.हा प्रकार म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा आहे.मागीलवेळी राज्यात झालेल्या विधानसभा व पद्वीधर निवडणुकीमध्ये जनतेनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत निवडुन दिले.यातुन राज्यातील ईडी सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याचे सिध्द होत असल्याचे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. राज्यातील ईडी सरकारच्या जनविरोधी कार्याचा पर्दाफाश करण्याकरीता संपुर्ण महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीतर्फे‘वज्रमुठ’ उपस्थित राहणार असुन ही सभा ऐतीहासीक होणार आहे.त्याकरीता महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकत्रीतरित्या नियोजन करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणुन विदभार्तील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर बैठका घेण्यात येणार असुन नागरीकांना नागपूर येथील ‘वज्रमुठ’ सभेची सविस्तर माहिती देण्यात येणार असल्यी माहिती माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भंडारा येथे सभा घेण्यात येत असुन नागपूर येथे दि.१६ एप्रिल रोजी ‘वज्रमुठ’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार,कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राकाँ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदि उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. नागपूर येथील सभेला संपुर्ण विदभार्तुन नागरीक मोठया संख्येने पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार,आ.अभिजीत वंजारी, राकाँ जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे ,राकाँ प्रदेश महासचिव धनंजय दलाल,माजी खा.मधुकर कुकडे, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख नरेश डहारे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, भंडारा जि.प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जि.प. सभापती रमेश पारधी, जि.प. सभापती मदन रामटेके, पे्रमसागर गणवीर, प्रकाश देशकर,जीया पटेल आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *