रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाºया टोळीचा पर्दाफाश!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : विविध सणवार आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वेतील वाढत्या गर्दीचा गैर फायदा घेत आपल्या वैयक्तिक ओळखपत्राने रेल्वेचे तिकीट आरक्षित करून जोरात काळाबाजार करणाºया टोळीचा रेल्वे पोलिसांनी पदार्फाश केला आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि सीआईबीच्या अधिकाºयांच्या १२ जणांच्या नागपूर येथील पथकाने चंद्रपूर शहर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राजुर या तीन ठिकाणी एकत्रितपणे ही कारवाई केली. या संदर्भात पोलिसांनी ठिकठिकाणी धाड टाकून ६ जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ज्या ६ जणांना अटक केली, त्यात आरोपीचंद्रपूर येथील श्रीराम वॉर्ड परिसरातील राणा गौरांग, बालाजी वॉर्ड परिसरातील पालोजित दादाची दुधे, बंगाली कॅम्प निवासी राहुल उत्तमकुमार उत्तमकुमार स्वामी, यवतमाळ जिल्ह्याचे वणी येथील रहिवासी जब्बार अरुण चिनी, वणी येथील साजिद सत्तार शेख आणि यवतमाळ जिल्ह्यातील राजुर येथील मोहम्मद खुशनूर हसमत अली यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींनीत्यांच्या दुकानातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्याचा गोरखधंदा चालविला होता.
पोलिसांनी प्रत्येकाच्या दुकानांवर धाड टाकून त्यांच्याकडून संगणक तसेच मोठ्या तिकिटांच्या व्यावसायिक वापरासाठी रेल्वे प्रशासनाकडून स्वतंत्र एजंट आयडी प्रदान केली जाते. याच आयडींमधून तयार केलेली तिकिटे प्रवाशांना विकण्याची परवानगी आहे. प्रमाणात रेल्वेचे ‘कंफर्म ई तिकिट’ जप्त केले आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता रेल्वे पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. सर्व आरोपी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांची वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकीट तयार करीत होते आणि मूळ किंमतीच्या कितीतरी जास्त पटीने प्रवाशांना ते विकत होते. अशी तिकीट विक्री रेल्वेच्या नियमांनुसार बेकायदेशीर असल्याचे मानले जाते. रेल्वे ज्यांच्या नेतृत्वाखाली ही कार- वाई करण्यात आली त्या चमूचे प्रमुख कृष्णा राय यांनी सांगितले की, आरोपी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर वेळे पूर्वीच ‘लॉग इन’ करून तिकिट बनवून घेत होते. त्याचा थेट फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून, त्यांना ‘कन्फर्म’ रेल्वे तिकीट मिळू शकले नाही. हे लोक प्रत्येक वेळी नवीन आयडी वापरायचे. त्यामुळे रेल्वेला मोठा तोटा सहन करावा लागला असून, सर्वसामान्य प्रवाशांना तिकीटापासून वंचित राहावे लागले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *