नक्षल्यांचा मोठा कट उघडकीस

गडचिरोली : गडचिरोलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत टिप्पागड जंगलात नक्षलवाद्यांकडून पुरवलेल्या साहित्यांचा पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. यामध्ये १२ बोर रायफल, देशी बनावटीचे ०२ स्फोटके, नक्षल लिखाण साहित्य, बॅनर, शुज व ईतर दैनंदिन वापराचे साहित्यांचा समावेश आहे. माहितीनुसार, धानोराअंतर्गत पोमके गॅरापत्ती हद्दीतील टिपागड जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नक्षलविरोधी अभियान पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी अभियान राबवितचौकशी केली. दरम्यान टिप्पागड जंगलात रस्त्याच्या कडेलगत नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके, रायफल आणि अन्य साहित्य सापडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून हि माहिती देण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *