घरफोडीतील दोन गुन्हेगारांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शहर पोलिसांनी घरफोडीतील गुन्ह्यातील दोन आरोपींना शहरातील सराफा मार्केट परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात श्रीकांत उर्फ नेहाल भगवानदास भिवगडे (१९ रा.सुंदरनगर) व एक विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे. शहर पोलिसांना ८ एप्रिल रोजी सराफा मार्केटमध्ये दोघे जण चोरीचे दागिने विक्री करण्याकरिता फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करुन श्रीकांत भिवगडे व विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळून ४ हजाराचे दागिने व ७७०० रुपये रोख असा ११, ७०० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान त्यांनी हा मुद्देमाल ४ एप्रिल रोजी तिरोडा येथील व ५ एप्रिल रोजी शहरातील शहीद मिश्रा वार्डात केलेल्या घरफोडीतील असल्याचे कबूल केले. पोलिसांनी श्रीकांत भिवगडे याला अटक करुन विधीसंघर्ष बालकाला सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *