जप्त केलेले सहा मोबाईल परत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पोलिस स्थापना दिन सप्ताह निमित्त विशेष मोहिम कार्यक्रमातंर्गत नागरिकांचे हरविलेले व पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केलेले सहा मोबाईल संबंधितांना परत केले. जिल्ह्यात २ ते ८ जानेवारी पोलीस स्थापना दिवस सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान नागरिकांच्या चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत मोबाईल चोरट्यांवर कारवाई करीत सहामोबाईल जप्त केले. दरम्यान ८ जानेवारी रोजी सदर मोबाईल मालक पंकज घरडे, संदेश बोरकर, दिनेश तावाडे, आंचल चंदेल, आशाचंद्र डहाट व फुलवंता वाघमारे यांना पोलिस ठाण्यात बोलावून सहनिशा केल्यावर सुपूर्द करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *