गोंदियात १५ तलवारींसह १४ चाकू जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : स्थानिक निर्मल शाळेजवळ फुटपाथवरील तंबूमधून हत्यारांची विक्री करणाºया आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने १४ नोव्हेंबर रोजी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून १५तलावार,७ स्टील गुप्ती व ७ चाकू जप्त केले. चमकोरसिंग स्वर्णसिंग सिंग, रा. क्लेजर, जि.तामतरन, पंजाब असे आरोपीचे नाव आहे. कोणत्यातरी मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने शहरात अवैधरित्या हत्यार आणून रेलटोली परिसरातील निर्मल शाळेजवळील फुटपाथवर आरोपीने तंबू थाटला होता. येथूनच तो हत्यारांची विक्री करीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी बनावटी ग्राहक त्याच्याकडे हत्यार खरेदीसाठी पाठ- विला. त्याने खरेदीचा सौदा पक्का झाल्याचा इशारा देताच सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याजवळून १५ हजार किमतीच्या १५ तलावारी, ३१०० रुपयांच्या ७ स्टील गुप्त्या व ३५00 रुपयांचे ७ चाकू असे एकूण २१ हजार ६०० रुपयांचे हत्यारे जप्त करण्यात आली. शेष म्हणजे, आरोपीने ७ नोव्हेंबर रोजी रेल्वेगाडीने शहरात हत्यारे आणली असून त्याची विक्री करीत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आरोपीची कसून चौकशी सुरु असून आतापर्यंत त्याने कुणाकुणाला हत्यारे विकली याचा शोध घेत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आरोपीवर भारतीय हत्यार कायद्याच्या भादंवि ४/२५, सहकलम १३५, महाराष्ट्र पोलिस कायदा ३७ (१) (३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *