… तसेच आज ना उद्या शरद पवार यांचे सुद्धा मत परिवर्तन होऊ शकते!

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी गोंदिया :- शरद पवार म्हणाले की अजित पवार हे आमचेच नेते आहेत तर मग अजित पवारांनी भाजपासोबत येण्याची भूमिका स्वीकारली तर अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत तर नेत्यांनी स्वीकारलेली भूमिका ही आपणास मान्य असायला पाहिजे असा मी म्हटलेलं आहे . माज्या बोलण्याच्या वेगळा अर्थ काढण्यात आला. ज्याप्रमाणे अजित पवार यांचं मतपरिवर्तन झालं तसचं आज ना उद्या शरद पवार यांचं सुद्धा मतपरिवर्तन होऊ शकते असे वक्तव्य भाजप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी गोंदियात भाजप ची जनसंवाद यात्रा दरम्यान माध्यमांशी बोलताना केले. तसेच येत्या २०२४ पर्यंत भाजप मध्ये काँग्रेस, उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेस आदि पक्षांसह इतरांचा ही भाजपपक्ष प्रवेशाचे बॉम्ब बलास्ट होताना दिसणार असा विश्वास ही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला .

प्रसंगी पुढे ते म्हणाले की येणाºया दिवसात महाविकास आघाडी मध्ये अस्वस्थता दिसेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वात भाजप निवडणूक जिंकेल असा ही विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच एका प्रश्नाच्या उत्तरात शरद पवार भाजपामध्ये येतील असं मी कधीच म्हटलं नाही ,शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल मी असं मी काहीही बोलणार नाही. शरद पवार यांनी मला मूर्ख म्हटलं परंतु ते वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही अशी भूमिका चंद्रशेखर बावणकुळे यांनी गोंदिया येथे प्रसार माध्यमांसमोर मांडली. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सगळे उद्योग हे गुजरात मध्ये नेण्याचा आरोप केला आहे त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की हे निवडणुकी करिता मांडलेले भूमिका आहे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये श्वेतपत्रिका काढली जेवढे उद्योग महाविकास आघाडीच्या काळात गुजरात मध्ये गेलेले आहेत. यावर बोलायला कोणीही तयार झालेला नाही. अजित पवार मुख्यमंत्री होतील असे कार्यकर्ते आणि नेत्यांचे म्हणणे आहे यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की प्रत्येक पक्षाच्या नेत्याला असं वाटते की आपल्या पक्षाच्या नेता हा मुख्यमंत्री व्हावा परंतु आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीचसर्वांना सांगितलाय की शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री राहतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *