पीआरएसआय हैदराबाद चॅप्टर चे अध्यक्ष डॉ.रामू एस.यांचा नागपुरात सत्कार

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी नागपूर : डॉ. रामू एस., अध्यक्ष, पब्लिक रिलेशन सोसायटी आॅफ इंडिया (ढफरक), हैदराबाद चॅप्टर. संत्रानगरीत त्यांचे आगमन होताच नागपूर विभागाच्या पदाधिकाºयांनी त्यांचे जंगी स्वागत व सत्कार केला. हॉटेल सेंटर पॉइंट, नागपूर येथे ढफरक चे राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम) श्री. एस.पी. सिंग, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष श्री. यशवंत मोहिते, उपाध्यक्ष श्री. अखिलेश हळवे, सचिव श्री. मनीष सोनी, सहसचिव श्री. प्रसन्न श्रीवास्तव, कोषाध्यक्ष श्री. शरद मराठे, संरक्षक श्री.अनिल गडेकर व कार्यकारिणी सदस्य श्री.प्रवीण टक्के व डॉ.मनोजकुमार यांनी डॉ.रामू यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. श्री.शरद मराठे यांनी त्यांचा टढळऊउ च्या वतीने भेट देऊन गौरव केला. डॉ.मनोजकुमार यांनी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.कमलेश्वर यांच्यावर लिहिलेले पुस्तक डॉ.रामू यांना भेट म्हणून दिले.

डॉ.रामू यांनी नागपूर चॅप्टरच्या पदाधिकाºयांशी पीआरएसआय हैदराबादच्या उपक्रम व कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली. नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष श्री.यशवंत मोहिते यांनी त्यांना नागपूरबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, (शनिवारी) संध्याकाळी नागपुरातील पदाधिकाºयांच्या बैठकीत अनेक कार्यक्रमांच्या नियोजन आणि अंमलबजावणीवर चर्चा झाली. डॉ. रामू यांनी या बैठकीचे आणि त्यांच्या मित्रांसोबत केलेल्या पाहुणचाराचे वर्णन केले. त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. पत्रकारिता आणि जनसंपकार्चा सखोल आणि प्रदीर्घ अनुभव असलेले, डॉ. रामू यांनी भारतीय प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालय अरउक हैदराबादमध्ये अभ्यासक्रम संचालक म्हणूनही योगदान दिले आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या हउछ महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यासाठी ते तीन दिवसांच्या नागपूर दौºयावर आले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *