गर्भवती महिलेस मारहाण,बाळाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील येडमाकोट येथील सात महिन्याचे गर्भवती महिलेस शारीरिक मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याने तिचे बाळ दगावल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरून सासू व पती विरोधात तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड करीत आहे तिरोडा पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार तालुक्यातील येडमाकोट येथील रहिवासी फिर्यादी महिला ७ महिन्याची गर्भवती असताना एप्रिल महिन्यापासुन तीची सासू व पती सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असून २३ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजताचे दरम्यान तिचे सासूने तुला आम्ही पैसे कुठून लावू तू आमच्याकडून पैसे तुज्या वडिलांकडे नेऊन देते असे म्हणून काठीने पाठ मान व गळ्यावर मारहाण केली तर पतीने थापडानीं मारहाण केल्याने तिला त्रास होऊ लागल्यामुळे प्राथमिक आरोग्य मुंडीकोटा येथून सुभाष रुग्णालय तूमसर येथे उपचार करता दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिची प्रसूती होण्याची शक्यता वर्तवल्या वरून बाई गंगाबाई रुग्णालय गोंदिया येथे दाखल केले असता तिची प्रसूती होऊन बाळ मरन पावला. फिर्यादी महिलेचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी महिलेच्या सासू हिरामोती कन्हैयालाल मुटकुरे ६५ वर्ष व पती सुनील कन्हैयालाल मुटकुरे २६ वर्ष यांचे विरोधात भादवी कलम ३१६३२४,३२३,४९८ (अ) व ३४ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.