थकीत पगारासाठी न.प.अग्निशमन विभागाचे कंत्राटी कामगारांची विरुगिरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- नगरपरिषद गोंदियाच्या अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाºयांना गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने अखेर त्यांचे हाल होत आहेत. पगाराच्या मागणीसाठी आज गुरुवारी कर्मचाºयांनी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याजवळील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. थंडी आणि अवकाळी पावसामुळे किमान तापमानातही विरुगिरी शैलीचा अवलंब केल्याने प्रशासन ही घाबरले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज ७ डिसेंबर रोजी सुमारे २० कंत्राटी कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढले या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. आंदोलकांनी सांगितले की, अग्निशमन दलात एकूण ४० कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर तैनात आहेत. गेल्या चार महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. थकीत पगार देण्याची अनेकवेळा मागणी करण्यात आली मात्र संबंधित विभाग व प्रशासनाक-डून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी आज २० कर्मचाºयांनी आपल्या वेतनाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी स्टाईल आंदोलन सुरू केले आणि प्रशासनाला सुद्धा इशारा दिला की जर कोणी जबरदस्तीने खाली उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वत:वर पेट्रोल टाकून येथेच आत्महत्या करू.

या आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तैनात करण्यात आले असून त्या २० कर्मचाºयांना पाण्याच्या टाकी वरुन बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. नागपूर हिवाळी अधिवेशना निमित्त गोंदिया जिल्हा दौ-यावर असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार हिरालाल राठोड रा. दौंड जि. पुणे यांना याबाबतची माहिती मिळाली असता त्यांनी स्थानिक पदाधिकारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेटदिली व सदर कंत्राटी कर्मचा-यांशी मोबाईल वर संवाद साधून त्यांच्या थकीत पगाराच्या मागण्या त्यांचे नेते आमदार रोहित पवार, आ. जयंत पाटील यांच्या पर्यंत पोहचवून ते नागपूरच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी ने मांडणार तसेच तुमच्या वर कोणतेही गुन्हे दाखल होणार नाही असे आश्वासन दिल्यानतर सदर कंत्राटी कर्मचारी दुपारी ३:३० च्या सुमारास पाणी टाकी वरून खाली उतरले. त्यांना माजी आमदार राठोड यांनी जिल्हाधिका-यांशी त्यांची भेट करवून त्यांच्या मागण्या प्रशासनाला कळविले. हे अधिवेशनचे सत्र संपण्यापूर्वी तुमच्या मागण्या पूर्ण असल्याचे आश्वासन माजी आमदार हिरालाल राठोड यांनी कंत्राटी कर्मचा-यांना दिल्या. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सौरभ राठोड, बाबा बैस आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *