सरपंचाच्या पतीदेवांचे शासकीय जागेवर अतिक्रमण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील ग्राम पंचायत दाभा येथील सरपंचाच्या पती ने दाभा ग्राम पंचायत क्षेत्रातील आबादी करीता राखीव असलेलल्या शासकीय जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करून सदर जागेमधुन शेकडो ब्रास अवैधरीत्या माती-मुरूमाचे उत्खनन करून त्याची परस्पर विक्री केल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. दाभा ग्राम पंचायतीच्या सरपंचा अस्मीता निरज शहारे या सन २०२१ पासुन ग्राम पंचायतीचा कारभार सांभाळत आहेत.दरम्यान सरपंचा अस्मीता शहारे व त्यांचे पती निरज शहारे यांनी संगणमत करून दाभा ग्राम पंचायत क्षेत्रातील आबादी करीता राखीव असलेल्या गट क्र.३८२ क्षेत्र १.०७ हे.आर. जागेवर अतिक्रमण करून सदर जागेमध्ये अवैधरीत्या मुरूम-मातीचे खोदकाम केले. सदर जागेतुन अंदाजे ६०० ते ७०० ब्रास एवढ्या मोठया प्रमाणात अवैधरित्या मुरूमाचे खोदकाम करून त्याची विक्री करीत शासनाला लाखो रूपयांचा चुना लावला आहे. सरपंचा व त्यांचे पतीदेव एवढयावरच न थांबता त्यांनी सदर जागेमध्ये शेतीपयोगी बांध्या (धान लागवडीकरीता आवश्यक असलेली जागा) तयार करून त्याठिकाणी धान लागवडीच्या हंगामात दि.२० जुलै २०२३ रोजी धान पिकाची लागवडसुध्दा केली व नंतर त्या धानपिकांची कापनीसुध्दा केली आहे.

शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी अवैधरीत्या शेती करणे हे शासकीय महसूल अधिनियमा अंतर्गत कायदेशिर गुन्हा ठरीत असतांना एका लोकप्रतिनिधीने त्याच्या पदाचा दुरूपयोग करून शासकीय नियम ढाब्यावर बसविण्याचा हा प्रकार आहे. सरपंचा अस्मीता शहारे यांनीआपल्या पदाचा दुरूपयोग करून गावातील आबादी करीता राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करीत ग्राम पंचायत कायद्याच्या कलम १४ (१) (ज-३ ) चे उलल्लंघन केलल्याने कलम १६ अंतर्गत भंडारा जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेवुन सरपंचा अस्मिता शहारे यांचे सरपंच पद रद्द करावे व शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी दाभा ग्राम पंचायतीचे सदस्य छगन गणविर, दिनेश लांबट,ग्रा.पं.सदस्य सुनंदा लांबट,सोनाली शहारे,सुभाष गायधने व अन्य गावकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *