आंतराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त भव्य ग्रंथ दिंडी यशस्वी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील श्रीमती सावित्री देवी शिवनारायण सारडा महिला समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आंतराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून महिला समाज प्राथमिक शाळे पासून ते गांधी चौकापर्यंत साक्षरता जनजागृती करण्यासाठी साक्षरता रॅली, ग्रंथदिंडीत पालखी व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. गांधी चौक येथे ग्रंथदिंडी व पालखी कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव सौ. नूतन मोघे, नगर परिषदेच्या माजी नगरसेविका चंद्रकला भोपे, श्रीमती सावित्री देवी शिवनारायण सारडा महिला समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धारस्कर, महिला समाज संस्थेच्या उपाध्यक्ष कोलते, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, मोघे, शिक्षक प्रमोद सेलोकर, शितल सार्वे, राजेंद्र हेडाऊ, सुनीता काकडे, वैशाली वैद्य, सौ बालपांडे, सौ धाबेकर, वैष्णवी मोहरकर, विपिन लाखे तसेच शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मार्ल्यापण करण्यात आले.

ग्रंथदिंडी व पालखीत पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना साक्षरतेचे महत्व पटवून देण्यासाठी भारताचे सर्वात मोठे ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान व ज्ञानेश्वरी पालखीत ठेवण्यात आली होती. ग्रंथदिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी बँड व लेझीमच्या सुरात तसेच फुगड्यांनी तर सर्व नारिकांचे लक्ष केंद्रित केले. आंतराष्ट्रीय साक्षरता जनजागृती दिंडी कार्यक्रम सार्वजनिक वाचनालयासमोर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘शिक्षा का महत्व हे पथनाट्य सादर शिक्षेचे महत्व’ आणि ‘शिक्षेचा अधिकार सर्वांनीच घ्यावा’ हा संदेश दिला. तसेच साक्षरता रॅलीत पथनाट्याच्या माध्यमातून वर्ग आठवी व वर्ग दहावीतील विद्यार्थ्यांनी ‘साक्षरता गीत’ सादर करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले. भारतात एकही मनुष्य निरक्षर नसावा सर्वांनी साक्षरतेचे महत्व जाणावे हाच संदेश घरोघरी पोहोचावा या उदेशाने श्रीमती सावित्री देवी शिवनारायण सारडा महिला समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली धारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढण्यात आली होती.

उपस्थित मान्यवर व महिला समाज संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ विशाखा गुप्ते, सचिव सौ नूतन मोघे तसेच संस्थेच्या सर्व पदधिकाºयांनी ग्रंथदिंडी व पालखीला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रिया भुते व प्रास्ताविक श्रध्दा वडनेरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्मिता काळबांधे यांनी मानले. साक्षरता रॅली, ग्रंथदिंडी व पथनाट्य कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुनील देवगडे, सुधाकर धाडसे, भुते, सार्वे, मनीष कोल्हे, राजेंद्र मेश्राम, जयेन्द्र पेटकुले, गणेश भगत, संजय भेदे, टिशा मलखाम, दिशा खांदाडे, अन्मया कोल्हे, सुष्टी भजनकर, आर्या कुंभारे, तन्वी शेंडे, आंचल गुरपुडे, गौरी राजाभोज, अनुष्का कुंभलकर, मृणाली चव्हाण, पूजा भेंडरकर, समीक्षा हेडाऊ तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थींनी, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *