अवैध रेती वाहतूकीचा टिप्पर पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : कन्हाळगाव (ता.मोहाडी) येथून लाखनी येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर महसूल विभागाच्या फिरत्या पथकाने शनिवारी (ता. ९ ) पहाटे ४:४० वाजताच्या सुमारास संताजी मंगल कार्यालय लाखनी समोर पकडुन चालकास रॉयल्टी बाबद विचारणा केली असता रॉयल्टी नसल्यामुळे टीप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा केला . जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरीही रेती तस्कर खुलेआम नदी पात्रातून रेतीचा उपसा व वाहतूक करीत आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकिवर प्रतिबंध लावण्याचे काम महसूल, खनिकर्म व पोलिस विभागाचे आहे . फिरते पथकाचे माध्यमातून गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्याचे काम केले जाते .

लाखनी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार धर्मेंद्र उरकुडकर यांच्या नेतृत्वात लाखनीचे मंडळ अधिकारी जयंत सोनवाणे, पिंपळगावचे मंडळ अधिकारी अतुल वºहाडे, पालांदूर चे मंडळ अधिकारी राकेश पंधरे व मोरगावचे तलाठी निशांत नेवारे यांचे पथक गस्तीवर असताना लाखनी शहरातील लाखोरी रोडवरील संताजी मंगल कार्यालयासमोर शनिवारी पहाटे ४:४० वाजता अवैधरित्याकन्हाळगाव (ता.मोहाडी) येथून रेतीची वाहतूक करताना टिप्पर क्रमांक एम एच ४० बीजे ४७५६ हा विना रॉयल्टी रेती वाहतूक करताना आढळून आला. त्याला पथकातील अधिकाºयांनी रेती वाहतुकीची रॉयल्टी मागितली असता टिप्पर चालक अतुल वाढई याच्याकडे रॉयल्टी मिळून आली नाही. टिप्पर चालकाने टिप्पर मालक सोनू बांते यांच्या सांगण्यावरून रेतीची वाहतूक केली असल्याचे सांगितले. दरम्यान महसूल विभागाच्या पथकाने पंचनामा करून ५ ब्रास रेतीसह टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयात जमा केला आहे. याप्रकरणी महसूल विभाग काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *