खा.पटेल यांच्या पुढाकाराने चार पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या पुढाकाराने जिल्ह्यातील नवेगावबांध, चोरखमारा, प्रतापगड, बोदकसा या ४ पर्यटनस्थळाच्या विकासा साठी २ कोटी ७७ लाखाची निधी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळ विकसित व्हावे यासाठी खा. प्रफुल पटेल हे सतत प्रयत्नरत राहतात. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचा विकास कामे प्रस्ताविक करण्यात आले. त्या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. मात्र, कार्यारंभा पूर्वीच राज्य सरकारने मंजूर कामांना थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विकास कामे रखडली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्य सरकारात सहभागी होताच विकास कामांना गती देण्याचे काम सुरु केले. थांबविलेल्या कामांना पुन्हा कार्यारंभाचा आदेश देण्यात यावे यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी संबंधित विभागाशी सतत पाठपुरावा केला परिणामी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागने ८ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करून सन २०२१-२२ मध्ये थांबविलेल्या पर्यटन विकासाच्या कामांवरील स्थगिती स्थगिती उठवून पुन्हा कार्यारंभ करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अंदाजे रकमेपैकी काही हिस्स्याची निधीही कामांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील नवेगावबांध, प्रतापगड,चोरखमारा व बोदलकसा या चार पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २ कोटी ७७ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये नवेगावबांध पर्यटनस्थळाच्या १२ कामांसाठी ५४ लाख, प्रतापगडच्या १७ कामांसाठी ६१ लाख, चोरखमाराच्या १६ कामांसाठी ८४ लाख व बोदलकस्याच्या १५ कामांसाठी ७८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर कामांना ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी खा. प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *