कौशल्य प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार मिळणे सुनिश्चित करावे- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरी किंवा रोजगार मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे उमेदवारांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा व्हावा तसेच त्यांच्या उपजिवीकेचे साधनही व्हावे हे संबंधित प्रशिक्षण केंद्रांनी सुनिश्चित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा कौशल्या विकास जिल्हास्तरीय समितीच्या सभेत मार्गदर्शन करतांना दिले. या समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील परिषद कक्षात घेण्यात आली. यावेळी जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.एम. शिवणकर व सर्व आय.टी. आयचे प्राचार्य तसेच जिल्हयातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हयातील पॉलीटेक्निक इंजीनिअरींग कॉलेजेस, जिल्हयातील सर्व इंडस्ट्री असोसीएन जिल्हयातील मोठया उद्योग समुहाचे प्रतिनिधी ही यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेतील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करून निवड झालेल्या उमेदवारांना पुढील सहाय्य देण्यासाठी जे.एम.पटेल महाविद्यालय येथे प्रत्याक्षीक घेण्यात आलेले असून यामध्ये मुकेश घनशाम बिसने यांची कृषि क्षेत्रातील बायो मास एश, आकाश खेडीकर यांचा इफ्रा मोबेलीटी बद्दल विजेता घोषीत करण्यात आल्याचे श्री. झळके यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *