भंडारा शहर कांग्रेस कमेटीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

भंडारा : शहर कांग्रेस कमेटी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भंडारा शहरातील गांधी चौक येथे अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जिवनपटावर थोडक्यात माहिती सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रामुख्याने भंडारा शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष प्रशांत देशकर, माजी जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणविर, इंटकचे अध्यक्ष धनराज साठवने, जिल्हा महिला अध्यक्षा जयश्री बोरकर, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, अल्पसंख्यक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अवैश पटेल तसेच कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *